देशभक्तीची किंमत केवळ ५ कोटी - नेटीझन्सची राज ठाकरेंवर आगपाखड

By admin | Published: October 22, 2016 03:24 PM2016-10-22T15:24:49+5:302016-10-22T15:39:25+5:30

काही अटी घालत करण जोहरच्या 'ए दिल' चित्रपटाला दर्शवलेला विरोध मागे घेेणा-या मनसेप्रमुख राज ठाकरेंची भूमिका अनेकांना पटलेली नाही.

The cost of patriotism is only about Rs. 5 crore - Netizens Raj Thackeray | देशभक्तीची किंमत केवळ ५ कोटी - नेटीझन्सची राज ठाकरेंवर आगपाखड

देशभक्तीची किंमत केवळ ५ कोटी - नेटीझन्सची राज ठाकरेंवर आगपाखड

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि २२ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी काही अटी घालत करण जोहरच्या ' ए दिल है मुश्किल' चित्रपटाला केलेला विरोध मागे घेतल्याने  दिवाळीच्या मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. 
भविष्यात पाकिस्तानी कलाकार, गायक, तंत्रज्ञ यांना बॉलिवूडमध्ये प्रवेश देणार नाही, हे लेखी आश्वासन, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी भारतीय जवानांना आदरांजली वाहणारी पाटी दाखवावी आणि ज्यांच्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असेल त्यांनी प्रायश्चित म्हणून आर्मी वेल्फेअर फंडला प्रत्येकी पाच कोटी रूपये द्यावे, या काही प्रमुख मागण्या राज यांनी निर्माते-दिग्दर्शकांच्या समोर ठेवल्या. त्या मान्य करत बॉलिवूड कलाकारांनी नरमाईची भूमिका घेत यापुढे कोणत्या पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणार नाही असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा मनसेच्या आंदोलनाचाच विजय असल्याचा दावा राज यांनी केला आहे.
प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींवर सोशल मीडियाद्वारे मतप्रदर्शन करणा-या नेटीझन्सनीही या मुद्यावरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे तर काहींनी मात्र या भूमिकेला थेट विरोध दर्शवला आहे. ' देशभक्तीची किंमत अवघी ५ कोटी रुपये', ' राज ठाकरेंसारख्यांकडून खंडणी म्हणून मिळालेल्या रकमेची भारतीय लष्कराला बिलकूल गरज नाही' या आणि अश अनेक प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त होत आहेत. 

Web Title: The cost of patriotism is only about Rs. 5 crore - Netizens Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.