मिरवणुकीचा खर्च टाळला अन लावली ९० झाडे

By Admin | Published: July 21, 2016 08:53 PM2016-07-21T20:53:49+5:302016-07-21T20:53:49+5:30

यंदाच्या वर्षीपासून सात रस्ता येथील कट्टा गणपती प्रतिष्ठानने मिरवणुक न काढण्याचा निर्णय घेतला आहे़ अनावश्यक खर्च टाळून या प्रतिष्ठानने हॉटेल त्रिपुरसुंदरी ते सात

The cost of procession was avoided and 90 trees of avalanche were avoided | मिरवणुकीचा खर्च टाळला अन लावली ९० झाडे

मिरवणुकीचा खर्च टाळला अन लावली ९० झाडे

googlenewsNext

शिवाजी सुरवसे

सोलापूर, दि. २१ :  यंदाच्या वर्षीपासून सात रस्ता येथील कट्टा गणपती प्रतिष्ठानने मिरवणुक न काढण्याचा निर्णय घेतला आहे़ अनावश्यक खर्च टाळून या प्रतिष्ठानने हॉटेल त्रिपुरसुंदरी ते सात रस्ता, व्हीआयपी रोड तसेच रामवाडीतील सोनामाता शाळा आदी ठिकाणी ९० मोठी झाडे लावली आहेत़ झाडांना हिरव्या जाळीचे कुंपण घालणे,पाणी घालणे आणि त्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रतिष्ठानच्या सभासदांनी केली आहे़ येणाऱ्या गणपती उत्सावापर्यंत किमान ३०० झाडे लावण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला आहे़

प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद खरबस यांच्या नेतृत्वाखाली आशिष साळवे, सुहास अभगराव, अजय घोरपडे, अमोल मुडके, वसंती पवार, शंकर दिंडोरे, किरण तिघलपल्ली, भारत गायगवळी, दत्ता मोरे, निशांत होसनूर आदी सभासदांनी एकत्र येऊन झाडे लावण्याचा विचार आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले़ आजवर व्हिआयपी रोडवर हॉटेल त्रिपुरसुंदरी, कारीगर पेट्रोलपंप, डाकबंगला, संगमेश्वर कॉलेज, मोंढे अ‍ॅटोमोबाईल तसेच पु़ना़ गाडगीळ या परिसरात या प्रतिष्ठानने झाडे लावली आहेत़ झाडे लावण्यापेक्षा ती जोपसण्यावर जास्त भर दिला आले़ आम्ही आमच्या आनंदासाठी काम करतो, झाडे लावतो़ १९९२ साली संगमेश्वर कॉलेजच्या मित्रांनी एकत्र येऊन कट्टा गणपतीची स्थापना केली आहे़ कोणाच्याही मदतीविना आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे आनंद खरबस म्हणाले़

Web Title: The cost of procession was avoided and 90 trees of avalanche were avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.