रेल्वे सब स्टेशनसाठी सहा कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 01:37 AM2016-10-31T01:37:37+5:302016-10-31T01:37:37+5:30

मुकाई चौक, रावेत ते भक्ती-शक्ती चौक, निगडी रस्त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

The cost of six crores for the Railway Sub Station | रेल्वे सब स्टेशनसाठी सहा कोटी खर्च

रेल्वे सब स्टेशनसाठी सहा कोटी खर्च

Next


पिंपरी : मुकाई चौक, रावेत ते भक्ती-शक्ती चौक, निगडी रस्त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मात्र, त्या दरम्यान असणाऱ्या रेल्वे सबस्टेशनचे स्थलांतरण करणे आवश्यक असून, त्यासाठी सुमारे पावणेसहा कोटी खर्च होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मुकाई चौक, रावेत ते भक्ती-शक्ती चौक, निगडी या दरम्यान ४५ मीटर रुंद बीआरटीएस रस्ता विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. निसर्ग दर्शन सोसायटी, रावेत येथे या रस्त्याचे पुणे-मुंबई लोहमागार्मुळे दोन भागात विभाजन होत आहे. याठिकाणी उड्डाणपूल बांधणे आवश्यक असून, त्यासाठी ८७ कोटी, ४६ लाख, ५० हजार, २६६ रुपये रकमेचे काम बी. जी. शिर्के कंपनीला देण्यात आले आहे. या रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे संकल्पचित्र मध्य रेल्वेकडे मान्यतेसाठी देण्यात आले आहे. मात्र, या उड्डाणपुलाच्या संकल्पचित्रानुसार रेल्वेलाइनजवळ असलेले सबस्टेशन स्थलांतरीत करणे गरजेचे आहे.
मध्य रेल्वेतर्फे या जागेची पाहणी करून सबस्टेशन स्थलांतरित करण्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे आणि २४ जुलै २०१५ रोजी महापालिकेला सादर केलेल्या पत्रान्वये स्थलांतर शुल्क मध्य रेल्वेकडे जमा करण्याची मागणी केली आहे. ५ कोटी ७७ लाख ६३ हजार ४३ रुपये इतके स्थलांतरण शुल्क असून, ते जमा केल्यावरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पत्रान्वये मध्य रेल्वेने कळविले आहे. महापालिकेच्या सन २०१६-१७च्या अंदाजपत्रकामध्ये निसर्ग दर्शन सोसायटीजवळील रेल्वेलाईनवर उड्डाणपूल बांधण्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
>रेल्वे उड्डाणपूल संकल्पचित्र आणि आराखड्यानुसार रेल्वेलाईनजवळ असलेले सब स्टेशन स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाला देण्यात येणाऱ्या ५ कोटी, ७७ लाख, ६३ हजार, ४३ रुपये इतक्या खर्चाच्या रकमेची तरतूद २० कोटींमधून केली आहे. त्याचप्रमाणे या उड्डाणपुलासंदर्भात अचानक उद्भवणाऱ्या घटनांमुळे बदल करावयाचा झाल्यास, त्यासाठी येणारा वाढीव खर्च रेल्वे बोर्डाला द्यायचा असल्यास आणि शासनाच्या कर प्रणालीमध्ये बदल झाल्यावर येणारा वाढीव खर्च होणार आहे.

Web Title: The cost of six crores for the Railway Sub Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.