कापूस उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत
By admin | Published: December 28, 2015 03:58 AM2015-12-28T03:58:07+5:302015-12-28T03:58:07+5:30
कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली असून, अनेक ठिकाणी कापसाचा वेचा संपायला आला आहे. मात्र खासगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसून, हमीदरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
राजरत्न सिरसाट, अकोला
कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली असून, अनेक ठिकाणी कापसाचा वेचा संपायला आला आहे. मात्र खासगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसून, हमीदरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने शेतकऱ्यांना साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये प्रतिक्ंिंवटल बोनस दिला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना यावर्षी तरी अग्रिम बोनस मिळेल का, याकडे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अग्रिम बोनस देण्याबाबत शासन अनुकूल असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी हीच घोषणा मागील वर्षी अकोल्यात केली होेती; पण शासनाने मागील वर्षी बोनसला खो दिला. या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा बिकट परिस्थिती असून, कापसाचे उत्पादन प्रचंड घटले आहे. विदर्भात कापसाचा उतारा अत्यंत कमी आहे.
या वर्षी आतापर्यंत खासगी व्यापाऱ्यांनी राज्यात ६५ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला आहे. कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने २ लाख ५० हजार क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) ५ लाख क्ंिवटलच्यावर खरेदी केली आहे. यावर्षी हमीदर ४१०० रुपये प्रतिक्ंिवटल असले, तरी पणन महासंघ व सीसीआय राज्यातील शेतकऱ्यांकडून प्रतिवारीनुसार कापसाचे दर ठरवत असल्याने प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खासगी बाजार आणि गुजरातकडे कापूस विकण्याचा ओढा आहे.