कापसाचे दर पोहोचले सहा हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 01:51 AM2018-10-30T01:51:07+5:302018-10-30T01:51:46+5:30

शेतकऱ्यांना दिलासा; २० हजार गासडी कापसाची आवक

Cotton prices have reached six thousand | कापसाचे दर पोहोचले सहा हजारांवर

कापसाचे दर पोहोचले सहा हजारांवर

अकोला : कापसाचे दर प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांवर पोहोचले असून, हमीदरापेक्षा हे दर ४०० ते ४५० रुपये अधिक असल्याने शेतकºयांना सणासुदीच्या दिवसात दिलासा मिळाला आहे. राज्यात दररोज २० हजार गाठी तर देशात एक लाख ३५ हजार क्विंटल आवक सुरू आहे.

यावर्षी लांब धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ५,४५० रुपये तर आखुड धाग्याच्या कापसाला ५,१५० रुपये हमीदर आहेत. मात्र सध्या बाजारभाव हमीदरापेक्षा ४०० ते ४५० रुपये जास्त आहे. सोमवारी अकोट व खामगाव बाजारपेठेत हे दर प्रतिक्विंटल ५,७५० ,५,८०० रुपयांवर होते.

Web Title: Cotton prices have reached six thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस