राज्यातील 34 केंद्रांवर हमीभावानुसार कापूस खरेदी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 06:11 PM2020-05-04T18:11:24+5:302020-05-04T18:11:33+5:30

लॉकडाऊनच्या काळात 36,500 क्विंटल कापसाची खरेदी

Cotton procurement started at 34 centers in the state | राज्यातील 34 केंद्रांवर हमीभावानुसार कापूस खरेदी सुरु

राज्यातील 34 केंद्रांवर हमीभावानुसार कापूस खरेदी सुरु

Next

मुंबई - भारतीय कापूस महासंघ आणि राज्यातील कापूस उत्पादक पणन महासंघ हमीभावानुसार कापसाची खरेदी करायाला तयार असून राज्यात या हमीदराने कापसाची खरेदी केली जात आहे.

राज्यात गेल्या  ऑक्टोबरपासून, हमीभावानुसार खरेदी सुरु आहे. 25 मार्चपर्यंत भारतीय कापूस महासंघाने 91.90 लाख क्विंटल म्हणजेच 18.66 लाख कापसाच्या गासड्याची खरेदी  केली आहे. राज्यातील 83 केंद्रांवरुन ही खरेदी करण्यात आली असून या कापसाचे एकूण बाजारमूल्य 4995 कोटी रुपये इतके आहे.

महाराष्ट्रात उत्पादित झालेल्या एकून कापसापैकी,  २५ मार्चपर्यंत 77.40 टक्के  कापसाची खरेदी सीसीआय आणि खाजगी व्यापाऱ्यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अद्याप 22.60 टक्के कापूस बाजारात आला नाही.  

या कापसापैकी, सुमारे  40 ते 50 % कापूस, ज्याची किंमत सुमारे 2100 कोटी असेल तो,  FAQ दर्जाचा असण्याची शक्यता आहे. या कापसाला चांगला बाजारभाव मिळाला नाही, तर त्याची हमीभावानुसार खरेदी व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असेल.   

राज्यात हमीभावानुसार खरेदी सूरु असून 34 केंद्रातून सीसीआयच्या मार्फत कापसाची खरेदी सुरु आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात 36,500 क्विंटल म्हणजेच  6900 गासड्या कापसाचे उत्पादन झाले. राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे या खरेदीवर नियंत्रण ठेवले जाते. 

सध्या कापसाच्या एकूण केंद्रांपैकी 27 केंद्रे रेड झोनमध्ये येत असून, या ठिकाणी 3 मेनंतर खरेदीप्रक्रियेला वेग येणार  आहे. उरलेल्या 22 केंद्रांवर सीसीआयने राज्य सरकारशी संपर्क साधला असून शेतकऱ्यांना कापूस देण्याची मागणी केली आहे. एकूण खरेदी  केलेल्या 4995 कोटी रुपयांपैकी 4987 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत.

Web Title: Cotton procurement started at 34 centers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.