राष्ट्रकुल संसदीय मंडळाची मुंबईत परिषद

By admin | Published: September 21, 2016 05:57 AM2016-09-21T05:57:36+5:302016-09-21T05:57:36+5:30

राष्ट्रकूल संसदीय मंडळाची सहावी परिषद २० ते २३ जानेवारी या कालावधीत होणार

Council of the Commonwealth Parliamentary Board | राष्ट्रकुल संसदीय मंडळाची मुंबईत परिषद

राष्ट्रकुल संसदीय मंडळाची मुंबईत परिषद

Next


मुंबई : राष्ट्रकूल संसदीय मंडळाची सहावी परिषद २० ते २३ जानेवारी या कालावधीत होणार असून या परिषदेस राज्यसभेचे सभापती, लोकसभा अध्यक्ष तसेच देशातील विविध राज्यांच्या विधिमंडळ पीठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज दिली.
परिषदेच्या तयारीसंदर्भात आज विधिमंडळात उच्चस्तरीय बैठक झाली. या वेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, वित्त विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.व्ही. जोशी, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के. एच. गोविंदराज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व राज्यांचे विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी व प्रधान सचिव आदी सुमारे साडेतीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ही परिषद ऐतिहासिक होण्यासाठी विविध विभागांनी तयारी करावी, असे ठरविण्यात आले.

Web Title: Council of the Commonwealth Parliamentary Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.