‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांची औरंगाबादला परिषद
By admin | Published: May 31, 2017 03:26 AM2017-05-31T03:26:39+5:302017-05-31T03:26:39+5:30
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या राज्यातील दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या राज्यातील दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी १२ जून रोजी औरंगाबाद येथे शेतकरी परिषद घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे दहा जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, प्रभारी तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा सादर करण्यात आला.
किती गावांमधील शेतकरी बाधित होणार आहेत, याची माहिती शरद पवार यांनी जाणून घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, समृद्धीच्या प्रश्नावर आंदोलनाची पुढील भूमिका ठरविण्यासाठी १२ जून रोजी औरंगाबाद येथे शेतकरी परिषद घेण्याचे जाहीर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील एकूण ८२ हजार ११२ हेक्टर क्षेत्रापैकी समृद्धी प्रकल्पानंतर फक्त २६ हजार ६८ हेक्टर इतकेच क्षेत्र शिल्लक राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.