पाण्यासाठी नगरसेवकाची अरेरावी
By Admin | Published: June 13, 2016 11:25 PM2016-06-13T23:25:29+5:302016-06-13T23:28:55+5:30
लातूर : टँकरच्या पाण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्तीला अरेरावीची भाषा वापरत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत अपशब्द वापरून शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवक श्रीदेवी औसे व त्यांचे
लातूर : टँकरच्या पाण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्तीला अरेरावीची भाषा वापरत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत अपशब्द वापरून शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवक श्रीदेवी औसे व त्यांचे पती शिवा औसे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काँग्रेस नगरसेविका श्रीदेवी औसे यांच्या घरावर भाजपाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत निषेध केला़ नगरसेविका श्रीदेवी औसे व त्या कार्यकर्तीमध्ये झालेल्या संभाषणाचा आॅडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे़
नगरसेवकाच्या मनमानीमुळे सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळणे अशक्य झाले आहे़ प्रभाग क्ऱ २१ मधील काही महिलांनी पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी नगरसेविका श्रीदेवी औसे यांचे घर गाठले़ मात्र, नगरसेविका औसे यांच्या पतींनी पाणी मिळत नसल्याची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली तरी आम्हाला काही फरक पडत नाही़ पाणी पाहिजे असेल तर पंकजा मुंडेकडेच जा, इथले आम्ही सरकार आहोत, असे म्हणत अपशब्द काढले़ भाडेकरूंनी आमच्यासोबत बोलू नये, घरमालक आणि आम्ही बघून घेऊ असे सांगत महिलांना धमकावल्याचे निवदेनात म्हटले आहे़ महिलांना अपशब्द काढून अपमान करणे, धमकी देणे याबाबत श्रीदेवी औसे व त्यांच्या पतीविरूध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे़ भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव स्वाती जाधव यांच्या नेतृत्वात नगरसेविका श्रीदेवी औसे यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी विवेक बाजपाई, राहुल कावळे, सुनिल मलवाड, शिवा शिसोदिया, सुवर्णा येलाले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)