व्यसनमुक्तीकरिता समुपदेशनाची गरज

By Admin | Published: February 12, 2017 12:21 AM2017-02-12T00:21:13+5:302017-02-12T00:21:13+5:30

बदलती जीवनशैली, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. पण व्यसन हे जसे स्वत:साठी घातक असते. तसेच आपल्या कुटुंबासाठीही. कारण आपल्या

Counseling requirement for de-addiction | व्यसनमुक्तीकरिता समुपदेशनाची गरज

व्यसनमुक्तीकरिता समुपदेशनाची गरज

googlenewsNext

- प्राची सोनवणे

बदलती जीवनशैली, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. पण व्यसन हे जसे स्वत:साठी घातक असते. तसेच आपल्या कुटुंबासाठीही. कारण आपल्या व्यसनाचा त्रास हा कुटूंबाला होत असतो. त्यामुळे व्यसन मनापासून सोडणेही आवश्यक असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणेही तितकेच गरजेचे आहे. नवी मुंबई शहरातील अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या पुढाकाराने गेली पाच वर्षे व्यसनमुक्तीकरिता समुपदेशन केले जात आहे. आजमितीस त्यांनी २,३०० लोकांना व्यसनमुक्त केले आहे.
समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी अन्वय व्यसनमुक्ती केंद्राने नवी मुंबईतील वाशी महानगरपालिका रुग्णालय, नेरुळमधील डी. वाय. पाटील रुग्णालय, इंदिरानगर झोपडपट्टी परिसर, कळंबोली परिसरात अन्वय संस्थेने सामाजिक कार्याचे जाळे पसरण्यास सुरु वात केली आहे. २०हून अधिक डॉक्टर्स व समुपदेशकांचा चमू नवी मुंबईतील तीन केंद्रांवर त्याकरिता काम करत आहे. केवळ तंबाखूमुळे भारतातील ३० टक्के लोक कॅन्सरग्रस्त झाले आहेत, असा निष्कर्ष निघाला आहे.
दारू, अमली पदार्थच नव्हे, तर तंबाखू, तपकीर, गुटखाजन्य पदार्थांमुळे महिलांमधील व्यसनाधीनता गेल्या दहा वर्षांत तिपटीने वाढली आहे. दारूशिवाय तंबाखू, मशेरी, तपकीर, गुटख्याच्या व्यसनातही अनेकजणी अडकल्या आहेत. त्यात कष्टकरी महिलांचे प्रमाण जास्त आहे. ‘गालाच्या कोपऱ्यात तंबाखूची चिमूट ठेवल्याशिवाय कामात उत्साहच येत नाही,’ अशी प्रतिक्रिया या महिला व्यक्त करत असल्याची माहिती स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष वृषाली मगदूम यांनी व्यक्त केली. कचरावेचक महिलांमध्ये दारूचे व्यसन पाहायला मिळत असून, उच्चभ्रू वस्तीतील तरुणींमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण जास्त असल्याचे मगदूम यांनी सांगितलसे.
द्रारिद्र्य, अस्वच्छता, अंधश्रद्धा, पुरु षप्रधानता हे सारं घेऊन घर सावरणारी बाईच व्यसनाच्या अधीन झाली, तर समाजातील समतोल राखणे अशक्य आहे. अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने वर्षभर व्यसनांचे दुष्परिणाम, त्यापासून होणारे आजार आदींविषयी जनजागृती केली जाते.
‘व्यसन हा रोग असून तो नियंत्रणात आणला की बरा झाला,’ असे प्रतिपादन अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे अजित मगदूम यांनी केले. हल्ली फॅशन स्टेटस राखण्यासाठी व्यसन केले जाते. महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच विद्यार्थिनींमध्ये दिवसेंदिवस व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. गोवंडी रेल्वे हॉस्पिटल येथे गेल्या तीन महिन्यांपासून अन्वय व्यसनमुक्ती केंद्राला सुरुवात झाली आहे.Þ केंद्राच्या माध्यमातून शहरातील कचरावेचक महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
स्र१ंूँ्र101291@ॅें्र’.ूङ्मे

समुपदेशन महत्त्वाचे
व्यसनमुक्तीकरिता सर्वच वयोगटांमध्ये समुपदेशनाची गरज आहे. अन्वय व्यसनमुक्ती केंद्रांने व्यसनमुक्तीच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलत विविध स्तरांमध्ये व्यसनांच्या आहारी गेलेल्या नागरिकांना त्यातून बाहेर काढले आहे. तंबाखूच्या आहारी गेलेल्या नागरिकांना ६ महिन्यांच्या समुपदेशनातून नियंत्रणात आणले जाते आणि हळूहळू व्यसनमुक्त केले जाते. तर ड्रग्जच्या आहारी गेलेल्या माणसाला नियंत्रणात आणण्याकरिता ५ वर्षांचा कालावधी लागतो. दारूपासून सूटका मिळविण्याकरिता किमान १ वर्ष समुपदेशनाचे काम संस्थेच्या वतीने केले जाते.


तरुणांनो सावधान
हल्ली इंटरनेटवरही डार्क नेट सारख्या साईट्सवर ड्रग्ज मिळत असल्याने तरुणपिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. त्यामुळे मुलांनी तर आपण तोंडात काय घालतो आहे याबाबत जागरूक असणे अतिशय गरजेचे आहे. पालकांनीही आपल्या पाल्याशी अभ्यासाव्यतिरिक्त संवाद साधावा. इंटरनेटवर तासन्तास बसणाऱ्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे.
- अजित मगदूम, प्रमुख अन्वय व्यसनमुक्ती केंद

Web Title: Counseling requirement for de-addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.