जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:01 PM2024-10-21T18:01:15+5:302024-10-21T18:02:38+5:30

Vidhan Sabha Election विधानसभेसाठी काल ९९ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये मराठवाड्यातील १६ जागांचा समावेश आहे.

counter for manoj Jarange factor BJPs new Out of 16 seats in Marathwada on how many seats gave Maratha candidates | जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

BJP Candidate List ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचा मराठवाड्यात सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला होता. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता अन्य सर्व मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका  बसू नये, यासाठी भाजपकडूनही मोर्चेबांधणी करण्यात आल्याचं दिसत असून याचे प्रतिबिंब भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीतही पाहायला मिळाले. भाजपने विधानसभेसाठी काल ९९ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये मराठवाड्यातील १६ जागांचा समावेश आहे. या १६ पैकी १० जागांवर भाजपने मराठा उमेदवार दिले आहेत.

आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेलं जातीय ध्रुवीकरण लक्षात घेता भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये मराठा उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. भाजपने काल जाहीर केलेल्या १६ पैकी तीन जागा या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. अन्य १३ मतदारसंघांपैकी १० मतदारसंघांमध्ये पक्षाने मराठा उमेदवार दिले असून उर्वरित तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांमध्ये ओबीसी तर एका मतदारसंघात जैन उमेदवाराला संधी दिली आहे.

मराठवाड्यातील कोणत्या मराठा उमेदवारांना भाजपकडून उमेदवारी?

हिंगोली - तानाजी मुटकुळे
तुळजापूर - राणाजगजीतसिंह पाटील
जिंतूर - मेघना बोर्डीकर
नायगाव - राजेश पवार
भोकर - श्रीजया चव्हाण
फुलंब्री - अनुराधा चव्हाण
भोकरदन - संतोष दानवे
परतूर - बबनराव लोणीकर
औसा - अभिमन्यू पवार
निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर

Web Title: counter for manoj Jarange factor BJPs new Out of 16 seats in Marathwada on how many seats gave Maratha candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.