देशातील निवडणूक प्रक्रिया बोगस - इम्तियाज जलील

By Admin | Published: April 22, 2015 11:36 AM2015-04-22T11:36:34+5:302015-04-22T11:56:21+5:30

देशातील निवडणूक प्रक्रिया अतिशय बोगस असल्याची टीका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Country election process bogus - Imtiaz Jalil | देशातील निवडणूक प्रक्रिया बोगस - इम्तियाज जलील

देशातील निवडणूक प्रक्रिया बोगस - इम्तियाज जलील

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २२ -  देशातील निवडणूक प्रक्रिया बोगस असल्याची टीका आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जलील यांनी हे वक्तव्य करत थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे.  औरंगाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते बोलत होते. निवडणूक आयोग माझे म्हणणे ऐकत असेल तर मी सांगू इच्छितो, की देशातील निवडणूक प्रक्रिया बोगस आहे.  संपूर्ण औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस ओळखपत्रांच्या आधारे मतदान केले जाते, असेही ते म्हणाले. तसेच शहरात रात्रभर मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदानाच्या दिवशीच अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने जलील यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Country election process bogus - Imtiaz Jalil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.