कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी देश सज्ज - उमा भारती

By admin | Published: July 5, 2017 09:40 PM2017-07-05T21:40:30+5:302017-07-05T21:40:30+5:30

भारत एक समर्थ राष्ट्र असून जागतिक पातळीवर त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक समर्थ पंतप्रधान असून त्यांच्या नेतृत्वात कुठल्याही

The country is ready to face any challenge - Uma Bharti | कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी देश सज्ज - उमा भारती

कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी देश सज्ज - उमा भारती

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 05 -  भारत एक समर्थ राष्ट्र असून जागतिक पातळीवर त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक समर्थ पंतप्रधान असून त्यांच्या नेतृत्वात कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी देश सिद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा व नदीविकास मंत्री उमा भारती यांनी केले.  भारत-चीनदरम्यान सीमेवर वाढलेल्या तणावाबाबत बोलत असताना चीनचे थेट नाव न घेता त्यांनी वरील वक्तव्य केले.
मंगळवारी उमा भारती नागपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांच्या घरीदेखील त्या गेल्या. उमा भारती यांनी सुमारे अर्धा तास सरसंघचालकांसमवेत चर्चा केली. 
गुरुपौर्णिमा जवळ येत असून हे दोघेही मला गुरुस्थानी आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आले होते. सरसंघचालकांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांचा इस्रायल दौरा हा खरोखरच ऐतिहासिक म्हणावा लागेल. रालोआच्या काळातच इस्रायलमध्ये यात्रेवरून प्रतिबंध हटविण्यात आले होते. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वांना एकत्र व्हावे लागेल. मोदी यांचा हा दौरा या दृष्टीने बराच महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत झाले आहे, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती निवडणुकांविषयी भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. ही निवडणूक राजकारणापलिकडची आहे. मीरा कुमार यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेदेखील राष्ट्रपती सत्ताधाºयांची साथ देतातच असे नाही. ते राजकारणापलिकडचे पद आहे, असे त्या म्हणाल्या.

 

Web Title: The country is ready to face any challenge - Uma Bharti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.