देशवासियांची रविवारची सुरुवात रांगेपासून

By admin | Published: November 13, 2016 09:08 AM2016-11-13T09:08:21+5:302016-11-13T09:39:07+5:30

रविवार असूनही आज दुपारी ३:३० वाजेपर्यंत देशभरातील बँका सुरु राहणार आहेत. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबदलीसाठी बँकाच्या बाहेर रांगा देशभरातरांगा लागल्या आहेत

The countrymen started Sunday from the queue | देशवासियांची रविवारची सुरुवात रांगेपासून

देशवासियांची रविवारची सुरुवात रांगेपासून

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - रविवार असूनही आज दुपारी ३:३० वाजेपर्यंत देशभरातील बँका सुरु राहणार आहेत. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबदलीसाठी बँकाच्या बाहेर रांगा देशभरातरांगा लागल्या आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई, उत्तरप्रदेशसह देशातील प्रत्येक शहरात बँकाबाहेर लोकांनी पहाटेपासूनच रांगेत उभं राहण पसंत केल आहे त्यामुळे देशवासियांची रविवारची सुरुवात एटीएम आणि बँकेच्या बाहेर रांगेपासून झाली आहे. नवी मुंबईत तर पहाटेपासूनच लोकांनी रांगा लावल्या आहेत. सुट्टी असल्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीतील मयूर विहार येथिल एटीमबाहार नागरीकांनी काल रात्रीपासूनचं रांग लावली आहे.

सर्व एटीएमबाहेर नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. तिस-या दिवशीची परिस्थितीदेखील सारखीच आहे. आजदेखील एटीएम सेंटरबाहेर नागरिकांनी सकाळपासून लांबच लांब रांगा लावल्या आहेत. काही ठिकाणी उशीरा एटीएम उघडत असल्याने, तर काही एटीएममध्ये पैसेच नसल्याने सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. 

Web Title: The countrymen started Sunday from the queue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.