देशातील पहिला बीजी-२ देशी कापूस आला!
By admin | Published: June 20, 2017 02:21 AM2017-06-20T02:21:20+5:302017-06-20T02:21:20+5:30
बहुप्रतीक्षित देशातील पहिले देशी बीजी-२ (बीटी) कापसाचे बियाणे तयार झाले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी
राजरत्न सिरसाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बहुप्रतीक्षित देशातील पहिले देशी बीजी-२ (बीटी) कापसाचे बियाणे तयार झाले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हे बीजी-२ कापसाचे बियाणे तयार केले आहे. कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर या वर्षी
याची चाचणी घेण्यात येत असून, येथील कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर या कापसाचे बियाणे लावण्यात आले आहे. या वर्षी चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षीच्या खरीप हंगामात हे बियाणे शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने देशी बीटी कापूस संशोधनात लक्ष घातले. कृषी विद्यापीठाचे मागील सात ते आठ वर्षांपासून हे संशोधन सुरू आहे. आता हे संशोधन पूर्ण झाले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२चे जीन्स टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. याकरिता हैदराबाद येथील बियाणे संशोधन संस्थेसोबत संशोधनाचा सामंजस्य करार करण्यात आला
होता. या वाणाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, या बियाण्याची चाचणी घेण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोल्यात मध्यवर्ती संशोधन कें्रद आहे. या केंद्रांतगत असलेल्या पश्चिम विभाग प्रक्षेत्रावर १० एकरात हे बियाणे चाचणीसाठी पेरण्यात आले आहे. पाऊस नसल्याने या बियाण्यांना सिंचनाद्वारे पाणी दिले जात आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एकेएच-०८१, एकेएच -८८२८ तसेच पीकेव्ही-रजत या कापसाच्या देशी सरळ वाणामध्ये बीटी-१ जीन्स टाकण्यात आला़