देशातले पहिले नॅनो डीएपी शेतकऱ्यांना तारणार; पिशवीमागे ७५० रुपये वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 08:19 AM2023-05-01T08:19:43+5:302023-05-01T08:20:23+5:30

कृषी केंद्रात येणार खत, पिकांची जोमाने वाढ व्हावी, यासाठी नत्र, स्फूरद आणि पालाश या तीन घटकांची आवश्यकता असते. डीएपीमध्ये हे तीनही घटक याेग्य प्रमाणात उपलब्ध असतात. 

Country's first Nano DAP to save farmers; It will cost 750 rupees per bag | देशातले पहिले नॅनो डीएपी शेतकऱ्यांना तारणार; पिशवीमागे ७५० रुपये वाचणार

देशातले पहिले नॅनो डीएपी शेतकऱ्यांना तारणार; पिशवीमागे ७५० रुपये वाचणार

googlenewsNext

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : देशातले पहिले द्रव्य रूपातील नॅनो डीएपी खत यावर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रारंभी नॅनो युरिया शेतकऱ्यांच्या हातात पडला. आता नॅनो डीएपी खत शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे. यामुळे एका पोत्यामागे शेतकऱ्यांची ७५० रुपयांची बचत होणार आहे. 

पिकांची जोमाने वाढ व्हावी, यासाठी नत्र, स्फूरद आणि पालाश या तीन घटकांची आवश्यकता असते. डीएपीमध्ये हे तीनही घटक याेग्य प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे दरवर्षी डीएपी खताची मागणी मोठ्या प्रमाणात होते; परंतु, याचे दर अधिक असतात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडते. यावर्षी प्रथमच नॅनो डीएपी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामुळे १,३५० रुपयांची खताची बॅग नॅनो डीएपीमुळे ६०० रुपयांत लिक्विडमध्ये बॉटल उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पोत्यामागे ७५० रुपये वाचणार आहेत.

डीएपी लिक्विडच्या पाच कोटी बॉटल 
लिक्विड स्वरूपातील नॅनो डीएपी देशभरात उपलब्ध होणार आहे. यात पाच कोटी बॉटल्सची निर्मिती होणार आहे. पुढील दोन वर्षांत नॅनो डीएपीच्या १८ कोटी बॉटल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गुजरातमधील कांडला आणि ओरिसातील पारादीप कारखान्यात नॅनो डीएपीची निर्मिती केली जात आहे. 

नॅनो डीएपीची अधिसूचना प्रसिद्ध
नॅनो डीएपी निर्मितीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. रासायनिक खताच्या अती वापराने जमिनीचा पोत खराब होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. आता द्रव स्वरूपातील नॅनो डीएपी फवारणीतून देता येणार आहे. यामुळे पौष्टिकता, गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्यासोबत आर्थिक भार कमी होण्यास मोलाची मदत मिळणार आहे.

राज्यभरात नॅनो डीएपी उपलब्ध होणार आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाचे पत्रही जिल्ह्यांना मिळाले आहे. खताच्या यादीमध्ये नॅनो डीएपीचा समावेश आहे. - अमोल राजगुरू, जिल्हा पणन व्यवस्थापक, यवतमाळ.

Web Title: Country's first Nano DAP to save farmers; It will cost 750 rupees per bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.