देशात पहिले लोणच्याचे लिंबू अकोल्यात विकसीत !
By admin | Published: October 20, 2016 07:38 PM2016-10-20T19:38:51+5:302016-10-20T19:39:24+5:30
लोणचं म्हटल की, तोंडाला पाणी आलेच... आंब्याचे लोणचे त्यासाठी सर्वश्रूत आहे. लिंबाच्याही लोणच्याची तेवढीच मागणी आहे.
राजरत्न सिरसाट
अकोला, दि. २० : लोणचं म्हटल की, तोंडाला पाणी आलेच... आंब्याचे लोणचे त्यासाठी सर्वश्रूत आहे. लिंबाच्याही लोणच्याची तेवढीच मागणी आहे. पंरतु त्या दर्जाचे लिंबू मिळत नसल्याने कागदी,बोदडी लिंबाचे लोणचे माहिला घालतात. आता मात्र लिंबाच्या लोणच्याची काळजी करायची गरज नाही, कारण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विशेष लोणच्याचेच लिंबू विकसीत केले आहे. देशातील हे पहिलेच संशोधन असल्याचा दावा या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ज्ञांनी केला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या लिंबूवर्गीय संशोधन विभागाने आतापर्यंत लिंबू व संत्रा फळाच्या विविध जाती विकसीत केल्या आहेत.त्या जातींना देशात चांगल प्रतिसाद आहे. पण लिंबूच्या लोणच्याची वाढती मागणी बघता, या कृषी विद्यापीठाने लोणनच्याचे संशोधन हाती घेतले होते.१३ वर्षांच्या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी ह्यअकोला लाईमह्ण या नावाने लिंबू विकसीत करण्यात यश आले आहे. जाड सालीचे हे लिंबू असून, वजन ७० ग्राम आहे. या लिंबाची साल जाड असल्याने लोणचे मोकळे होते. विशेष म्हणजे या लिंबामध्ये गर जास्त असून, हेक्टरी उत्पादन २८ ते ३० क्ंिवटल आहे. बोदडी लिंबापेक्षा हे उत्पादन जास्त आहे.
या लिंबाच्या अनेक पातळ््यावर चाचण्या घेण्यात आल्या असून, लोणचे व पीक प्रात्यक्षीकही घेण्यात आले. सद्या लिबांची ही जात पुर्व प्रसारीत अवस्थेत असून, येणाऱ्या कृषी संशोधन आढावा समितीसमोर सादरीकरण केले जाणार आहे. त्यांनतर राज्यस्तरीय संशोधन सल्लागार आढावा समितीपुढे ठेवण्यात येईल. तेथे मान्यता मिळाल्यानंतर व्यावसायिक उपयोगासाठी ही लिंबाची जात प्रसारीत होईल.
लिंबामध्ये सी- जीवनसत्व भरपूर असून, प्रतिरोधके,पोटातील आजारावर गुणकारी आहे.त्यामुळे लिंबाच्या लोणच्याची मागणी अलिकडे वाढली आहे.
- १३ वर्षाच्या परिश्रमानंतर लोणच्याचे लिंबू ह्यअकोला लाईम -३ह्ण या नावाने विकसीत केले आहे. सद्या ही जात पुर्व प्रसारीत आहे. येणाऱ्या संशोधन आढावा समितीसमोर हे लिंबू मान्यतेसाठी ठेवले जाईल.
डॉ.दिनेश पैठणकर,
वरिष्ठ शास्त्रज्ञ,
लिंबूवर्गीय संशोधन केंद्र,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.