देशातील पहिलाच टिकाव-फावड्याचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2017 04:00 AM2017-05-24T04:00:29+5:302017-05-24T04:00:29+5:30

येथे सोमवारी (दि. २२) देशातील पहिला दोन निर्जीव वस्तूंचा विवाह सोहळा साजर झाला.

Country's first sustainable wedding | देशातील पहिलाच टिकाव-फावड्याचा विवाह

देशातील पहिलाच टिकाव-फावड्याचा विवाह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळस : येथे सोमवारी (दि. २२) देशातील पहिला दोन निर्जीव वस्तूंचा विवाह सोहळा साजर झाला. यामध्ये विजयीभव (टिकावराव) श्रीमंत पाणीदार जलसंधारण, कळसकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र (ता. इंदापूर, जिल्हा पुणे) व भुवजचुडेमंडित (फावडेताई) श्रीमंत सुजलाम् सुफलाम् निरगुडेकर (रा. निरगुडे, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) यांची ज्येष्ठ कन्या, हा देशातील आगळावेगळा ‘पाणी फाउंडेशन’ सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा- २०१७ श्रमदान लग्नसोहळा आज दोन्ही गावांच्या मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या थाटामाटात सायंकाळी झाला.
या वेळी दोन्ही गावचे वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आहेर म्हणून झाडांच्या बिया व रोपे स्वीकारण्यात आली. हा लग्न समारंभ येथील गुरवाचा ओढा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. येथे मागील ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस होता. पाणी फाउंडेशनची स्पर्धा सुरू झाल्यापासून लोकांचा सहभाग कमी असल्याने अपेक्षित काम झाले नाही. त्यामुळे कळसकर आणि निरगुडे या दोन गावांमध्ये एका टिकावापासून व एका फावड्यापासून सुरू झालेले काम भविष्यात श्रमदान, जलश्रमदान ही लोकचळवळ निर्माण व्हावी. म्हणून कळस येथे आगळा आणि वेगळा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम झाला. या लग्नसोहळ्याच्या लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या.

पुढच्या वर्षी करणार टिकावराव- फावडेतार्इंचा सामुदायिक विवाह...
एक टिकाव व एक फावडे एकत्र आणले तर मोठ्या प्रमाणात काम होईल. आगामी काळात त्यांची संख्या ५० झाली तर पूर्ण गाव दुष्काळमुक्त व टँकरमुक्त होईल. त्यामुळे पुढच्या वर्षीदेखील यांचा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचा निरगुडे व कळस गावाचा मनोदय आहे. कळस व निरगुडे या गावात श्रमदान व यांत्रिकीकरणाचे काम दुष्काळमुक्तीसाठी टाकलेले एक पाऊल. हा विवाह सोहळ्यातून एक संदेश देण्यात आला. सामाजिक विकासासाठी चळवळीचे रूपांतर लोकचळवळीत होण्यासाठी काही कालावधीची गरज असते. या चळवळीत स्वार्थी माणसे आली, की चळवळ नामशेष होते. नि:स्वार्थी माणसे एकत्र आली, की चळवळ हळूहळू जोमात वाढते.

Web Title: Country's first sustainable wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.