कुरिअर कंपनीने केला पीएफचा अपहार
By admin | Published: January 7, 2017 01:06 AM2017-01-07T01:06:52+5:302017-01-07T01:06:52+5:30
६ लाख ४ हजार १८९ रुपयांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याप्रकरणी अलंकार पोलिसांनी व्हिझार्ड कुरिअर प्रा. लि. कंपनीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला
पुणे : कुरिअर कंपनीने कामगारांच्या पगारामधून कपात केलेल्या ६ लाख ४ हजार १८९ रुपयांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याप्रकरणी अलंकार पोलिसांनी व्हिझार्ड कुरिअर प्रा. लि. कंपनीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत वासुदवे पाळंदे (रा. एरंडवणा, कर्वे रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश पात्रा (वय ४५, रा. गारमळा, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिझार्ड कुरिअर कंपनीचे एरंडवण्यामध्ये कार्यालय आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून जुलै २०१५ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये कपात केलेली ६ लाख ४ हजार १८९ रुपयांची रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये भरली नाही. या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)