मेट्रोचे भाडे निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश
By admin | Published: June 25, 2014 01:59 AM2014-06-25T01:59:04+5:302014-06-25T01:59:04+5:30
मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यासाठी लवाद स्थापन करावा ही एमएमआरडीएची मागणी उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली़
Next
>मुंबई : मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यासाठी लवाद स्थापन करावा ही एमएमआरडीएची मागणी उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली़ मात्र प्रवास दर निश्चित करणा:या समितीने मेट्रोचे प्रवास भाडे तात्काळ ठरवावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. त्यामुळे आता समिती काय भाडे निश्चित करणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आह़े
यासाठी एमएमआरडीएने याचिका केली होती़ त्यानुसार, रिलायन्स कंपनीला नफा मिळावा म्हणून मेट्रो सेवा सुरू केलेली नाही़ नागरिकांना परवडेल अशा भावात प्रवास भाडे असणो आवश्यक आह़े आणि करारानुसार रिलायन्स कंपनी परस्पर भाडे वाढ करू शकत नाही़ यासाठी समिती नेमलेली असून तिने योग्य तो निर्णय घेतला नाही़ तेव्हा आता यासाठी न्यायालयानेच लवाद स्थापन करावा, अशी मागणी एमएमआरडीएने याचिकेत केली होती़
मात्र आम्ही केवळ 1क्, 2क्, 3क् व 4क् रूपयेच भाडे निश्चित केले असून एमएमआरडीएला 9, 11 व 13 रूपये प्रवास भाडे हवे आह़े हे चुकीचे आह़े सध्या मेट्रो सुरू असलेल्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील आमचे प्रवास भाडे मुंबईकरांना नक्कीच परवडेल, असा दावा रिलायन्सने केला होता़ अखेर वरील आदेश न्या़ रमेश धानुका यांच्या खंडपीठाने एमएमआरडीएची याचिका फेटाळली़ (प्रतिनिधी)