न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे
By admin | Published: July 11, 2014 11:50 PM2014-07-11T23:50:24+5:302014-07-11T23:50:24+5:30
फिर्यादीने न्यायालयात सांगितलेल्या बाबी आणि जबाबात साम्य नसल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. ढवळे यांनी नगरसेवक प्रशांत शितोळेसह चौघांची गुरुवारी सुटका केली.
Next
पुणो : नवरात्रोत्सव मिरवणुकीत तरुणाचा खून केल्याप्रकरणी व्यवस्थित तपास न केल्याबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढताना फिर्यादीने न्यायालयात सांगितलेल्या बाबी आणि जबाबात साम्य नसल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. ढवळे यांनी नगरसेवक प्रशांत शितोळेसह चौघांची गुरुवारी सुटका केली.
प्रशांत कृष्णराव शितोळे (36, रा. स्नेहांकित बंगला, शितोळेनगर, सांगवी), गणोश बाजीराव ढमाले (24), अमित दिलीप गांधी (27) व हर्षल माकर (27, तिघेही रा. सांगवी) अशी सुटका करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
फिर्यादींना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रात्री दोन वाजेर्पयत उपचार सुरू होते. मात्र, पोलिसांनी नोंदविलेली फिर्याद रात्री साडेबाराच्या सुमारास कशी नोंदविली गेली, बेशुध्द असताना तक्रार कशी नोंदवून घेण्यात आली, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
तसेच साक्षीदारांचे जबाबही पोलिसांनी सात दिवसांनी नोंदविल्याने, फिर्यादीच्या सांगण्यात आणि जबाबात तफावत आढळल्याने गुन्ह्याचा पोलिसांनी योग्य तपास लावला नाही, असे ताशेरे मारत न्यायालयाने आरोपींची मुक्तता केली. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. हेमंत झंजाड, अॅड. एन. डी. पवार, अॅड. धैर्यशील पाटील, अॅड. विजय नहार यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
3 ऑक्टोबर 2क्11 रोजी रात्री पावणोअकरा वाजण्याच्या सुमारास नवरात्र तोरण उत्सवात जय गणोश मित्र मंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. जुनी सांगवी ते शितोळेनगर अशी मिरवणूक जात असताना तुषार राजेंद्र ढोरे (रा. सांगवी), फिर्यादी गणोश सुभाष ढोरे (25, रा. सांगवी) व अजिंक्य ढोरे हे दुचाकीवरून जात असताना वाद झाला. तुषार ढोरेवर तलवारीने वार करून त्याचा जागीच खून केला होता, तर गणोश ढोरे यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.