मुख्यमंत्र्यांविरुद्ध चौकशीस न्यायालयाचा नकार
By admin | Published: January 17, 2015 04:23 AM2015-01-17T04:23:13+5:302015-01-17T04:23:13+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरकारी वकील भारती डांगरे यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध गैरप्रकाराच्या आरोपाप्रकरणी चौकशीचे निर्देश देण्यास
पंढरपूर : विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यामध्ये जुन्या चार लाकडी बॅटन पट्टया काढून तेथे नवीन पट्ट्या लावत मंदिर समितीने गाभा-यात तात्पुरती डागडुजी केली. सोमवारी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातच शिखराच्या आतील बाजूस लावलेला वासा मूर्तीच्या दिशेने कोसळला होता. मात्र सुदैवाने मखर तसेच चांदीच्या छत्रीमुळे विठ्ठल मूर्ती सुरक्षित राहिली.
या घटनेनंतर मंदिर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे यांनीही तातडीने वास्तुविशारदांना बोलावून गाभाऱ्याची स्थिती जाणून घेतली. कळसाच्या आतील बाजूस पावसाचे पाणी येऊ नये यासाठी लोखंडी पत्रा लावलेला होता. त्याला आधार देण्यासाठी चार छोटे वासे लावले होते. हे वासे आणि पत्रा कोणत्या काळात लावले आहेत याची माहिती ना मंदिरातील पुजाऱ्यांना आहे आणि ना मंदिर समितीकडे आहे. शिवाय मंदिराची देखभाल दुरुस्ती करतानाही हे वासे कुजल्याचे मंदिर समितीच्या लक्षात आले नव्हते. (प्रतिनिधी)