दाऊदच्या इमारतीमधील रहिवाशी जाणार कोर्टात
By admin | Published: January 13, 2017 02:19 PM2017-01-13T14:19:37+5:302017-01-13T14:19:37+5:30
1980 च्या दशकात दाऊदची आई अमीना बी यांनी अब्दुल हुसेन दामारवाला यांच्याकडून ही इमारत विकत घेतल्याचे इथे राहणा-या एका रहिवाशाने सांगितले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - संपत्ती जप्त करणा-या लवादाने केंद्र सरकारला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतील दोन इमारती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. दाऊदच्या या दोन इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांनी आम्हाला खोल्या रिकाम्या करायला सांगितल्या तर आम्ही कोर्टात जाऊ असे सांगितले.
जे.जे. मार्गावरील दामारवाला आणि शबनम गेस्ट हाऊस या बिल्डींगमध्ये 24 पेक्षा जास्त कुटुंबे राहतात. या दोन्ही मालमत्ता बेकायद पद्धतीने ताब्यात घेण्यात आल्याने एसएएफईएमए कायद्याखाली जप्त करण्याचे लवादाने आदेश दिले. दाऊदचा लहान भाऊ इक्बाल कासकर दामारवाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहतो.
या इमारतीत 24 कुटुंबे राहतात. 1980 च्या दशकात दाऊदची आई अमीना बी यांनी अब्दुल हुसेन दामारवाला यांच्याकडून ही इमारत विकत घेतल्याचे इथे राहणा-या एका रहिवाशाने सांगितले.