Covid Cases In Maharashtra: चोवीस तासांत राज्यात २७ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, Omicron चे ८५ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:16 PM2022-01-29T23:16:14+5:302022-01-29T23:21:02+5:30
Covid Cases In Maharashtra: शुक्रवारच्या तुलनेत महाराष्ट्रात शनिवारी सापडले अधिक रुग्ण.
Covid Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोज चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात २७ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. असं असलं तरी दुसरीकडे राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात २७,९७१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ५०,१४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या २,४४,३४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय गेल्या चोवीस तासांत राज्यात ८५ नव्या ओमायक्रॉन बाधितांचीही नोंद करण्यात आली.
यानंतर महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३१२५ वर पोहोचली आहे. तर १६७४ रुग्णांची अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलीये. पुण्यात गेल्या चोवीस तासांत ओमायक्रॉनच्या ४४ तर मुंबई ३९, पउमे ग्रामीण १ आणि अकोल्यात १ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 29, 2022
२९ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण-१४११
२४ तासात बरे झालेले रुग्ण-३५४७
बरे झालेले एकूण रुग्ण-१,०१२,९२१
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण-१२१८७
दुप्पटीचा दर-३२२ दिवस
कोविड वाढीचा दर (२२जानेवारी-२८ जानेवारी)-०.२१%#NaToCorona
मुंबईत कोरोनामुक्त अधिक
सध्या मुंबईत दिलासादायक चित्र दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण अधिक दिसून आलंय. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ३५४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १४११ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईत सध्या १२ हजार १८७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ३२२ दिवस इतका झाला आहे.