बक्षीस म्हणून गाय
By Admin | Published: May 5, 2016 05:46 AM2016-05-05T05:46:31+5:302016-05-05T05:46:31+5:30
फ्रान्समधल्याच लीमोश गावातली कार्टुनच्या संदर्भातील प्रथा रंजक आहे. लीमोश हे गाव गोपालनासाठी म्हणजेच गायी-गुरांची पैदास आणि दुधदुभत्यासाठी प्रसिद्ध आहे.
फ्रान्समधल्याच लीमोश गावातली कार्टुनच्या संदर्भातील प्रथा रंजक आहे. लीमोश हे गाव गोपालनासाठी म्हणजेच गायी-गुरांची पैदास आणि दुधदुभत्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे सर्कससारख्या मोठ्या तंबूत कार्टुन्सचं प्रदर्शन भरतं. ही प्रथा आजमितीसही अव्याहत सुरू आहे. या प्रदर्शनात पहिलं बक्षीस काय मिळतं, हे ऐकून चकीत व्हायला होतं. पहिल्या क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या कार्टुनिस्टला बक्षीस म्हणून चक्क गाय दिली जाते!