लेण्यांना ‘संरक्षण’रूपी श्वासाची गरज

By admin | Published: November 3, 2016 05:14 AM2016-11-03T05:14:39+5:302016-11-03T05:14:39+5:30

देशात जेवढ्या लेण्या आहेत त्यांपैकी ७८ टक्के लेण्या महाराष्ट्रात आहेत.

Cows need breathing 'protection' | लेण्यांना ‘संरक्षण’रूपी श्वासाची गरज

लेण्यांना ‘संरक्षण’रूपी श्वासाची गरज

Next

महेश चेमटे,

मुंबई- देशात जेवढ्या लेण्या आहेत त्यांपैकी ७८ टक्के लेण्या महाराष्ट्रात आहेत. यापैकी काही लेण्यांमध्ये पाणी गळत झिरपत आहे. तर काही शिल्पांची पडझड झाल्याचे दिसून येते. इतिहास गौरव वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी त्या वास्तूंची जडणघडण लक्षात घेणे गरजेचे आहे. त्या खडकांची रचना समजावून घेतल्यांनतर ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. राज्यातील दुर्लक्षित लेण्यांचा अवस्था पाहता त्यांना संरक्षणरुपी श्वासाची गरज असल्याचे दिसून येत आहे.
लेण्यांमध्ये दगड कोसळणे, शिल्पांची पडझड होणे, झीज होणे या घटना भूशास्त्रीय कारणांशी निगडित आहेत. महाराष्ट्रातील अंबेजोगाई येथील लेणी प्रामुख्याने बेसॉल्ट खडकांत कोरलेल्या आढळतात. इतर खडकांच्या तुलनेत बेसॉल्ट कठीण खडक आहे. लेण्या कोरताना कलाकारांनी खडकाची रचना नक्कीच जाणून घेतली असेल. देशातील जवळपास १५५० लेण्यांपैकी महाराष्ट्रात १२०० लेण्या आहेत. याचा अर्थ राज्यात ७८ टक्के लेण्या आहेत. लेण्या निर्मितीच्या दृष्टीने, त्यातील सुबक नक्षीकाम करण्यासाठी राज्यातील खडक योग्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुरातन लेण्यांनी राज्य समृद्ध आणि संपन्न आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या उदासीन धोरणामुळे ऐतिहासिक वास्तूंचा ऱ्हास होत असल्याचे लेणी अभ्यासक आणि संशोधक डॉ. अनिता राणे-कोठारे यांनी सांगितले.
राज्यातील अस्तित्वात असलेल्या सर्व लेण्यांचे जतन व संरक्षण करणे तूर्तास तरी शक्य नाही. त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आर्थिक चणचण असल्याचे पुरातत्व व संग्रहालयाचे संचालक सुशिल गर्जे यांनी सांगितले. राज्यातील अपूर्णावस्थेत आणि दुलर्क्षित १८० लेण्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. त्यानुसार त्या लेण्यांचा अभ्यास करुन रचना कोणत्या काळात झालेली आहे, हे जाणून घेतल्यानंतर त्यांची वर्गवारी करुन लेण्या जतन करण्यात येणार आहे. मात्र सगळ््याच लेण्यांचे संरक्षण करणे शक्य नाही. त्या त्या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन स्थानिकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे गर्जे यांनी सांगितले.
राज्याच्या पुरातत्व विभागाचा कारभार राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. सांस्कृतिक मंत्रालयाची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे आहे. मुळात एकाच वेळी विविध खात्याचा कारभार चालवताना तावडे यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र लेणी अभ्यासक आणि इतिहास संशोधकांची संवाद साधला असता, ते म्हणाले पुरातत्व विभागाच्या गरजा ओळखून संबंधित मंत्र्यांनी त्वरीत योग्य ती पावले उचलावी. अन्यथा इतिहास वैभवाने समृद्ध असलेल्या महाराष्ट्राचा ‘इतिहासातच होता महाराष्ट्र’अशी म्हणण्याची वेळ येईल. (समाप्त)
>‘वैभव स्मारक दत्तक योजना’ पुन्हा राबवणार
पुरातन वास्तूंसाठी तयार करण्यात आलेल्या वैभव स्मारक दत्तक योजनेला राज्यातील विविध भागात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा वैभव स्मारक दत्तक योजना राबवणार आहे. शिवाय विविध कॉर्पोरेट कंपन्यांना देखील पुढाकार घेतल्यास ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे शक्य आहे. मात्र कॉर्पोरेट कंपन्यांनी लेण्यांचे जतन-सरंक्षण करताना वास्तूचे ऐतिहासिकपणा जपणे बंधनकारक आहे.
- सुशिल गर्जे, संचालक, पुरातत्व व संग्रहालय संचालनालय
संरक्षित लेणी
संचालनालयनाव ठिकाणतालुकावर्गवारी
नाशिकजैन लेणीचांडवडचांडवड क
जैन लेणीअंजनेरीत्रंबकक
जैन लेणीअंजनेरी त्रंबकक
नंदूरबार जैन लेणीशहादाशहादाक
नागपूरऋषी तलावभटाळावरोराड
औरंगाबादघटोत्कचजिंजालासोयगावअ
रुद्रेश्वर वेताळवाडी सोयगावअ
जोगेश्वरी घाटनांद्रासिल्लोडअ
उस्मानाबाद धाराशिवउस्मानाबाद उस्मानाबादअ
चांभार लेणीउस्मानाबादउस्मानाबादक
बीडजोगी सभामंडपअंबेजोगाई अंबेजोगाईक
भोकरधनभोकरधनभोकरधनअ
पुणेभंडारामावळ पुणे-
भामचंद्रखेडपुणे-
कोल्हापूर पांडवदरा दळवेवाडीशाहूवाडीब
नांदेडपांडवलेणीमाहूर माहूरब
हिंदू लेणीशिऊर हदगावब
लातूर खरोसाखरोसा निलंगाब
रत्नागिरी बौद्धखेडखेडक
ठाणेखंडेश्वरीलोणाड भिंवडीअ
>नाशिक संचालनालयाकडे ४ , नागपूर-१ औरंगाबाद-७ , नांदेड -३, पुणे-३ आणि रत्नागिरीकडे २ लेणी अशा प्रकारे विविध संचालनालयाकडे एकूण २० लेणी संरक्षणाची जबाबदारी आहे.

Web Title: Cows need breathing 'protection'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.