भाकपाचा अर्धनग्न मोर्चा
By admin | Published: April 4, 2015 04:29 AM2015-04-04T04:29:35+5:302015-04-04T04:29:35+5:30
ज्येष्ठ परिवर्तनवादी नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून जाणीवपूर्वक भरकटविला जात आहे, असा आरोप करीत भारतीय कम्युनिस्ट
कोल्हापूर : ज्येष्ठ परिवर्तनवादी नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून जाणीवपूर्वक भरकटविला जात आहे, असा आरोप करीत भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी कोल्हापुरात आत्मक्लेश म्हणून अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. यातून बोध घेत खुन्यांचा शोध घ्यावा अन्यथा प्रसंगी आम्हालाही हातात शस्त्रे घ्यावी लागतील, असा इशारा भाकपाने दिला आहे.
अॅड. पानसरे यांची हत्या होऊन ४६ दिवस होऊन गेले. अजूनही तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे तुणतुणे वाजविले जात आहे. धर्मांध शक्तींच्या दिशेने तपास करणे अपेक्षित आहे; पण तपास जाणीवपूर्वक दिशाहीन केला जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
भाकपाचे नेते रघुनाथ कांबळे म्हणाले, की पानसरेंचा खुनी आणि मास्टरमाइंड कोण याच्या तपासासाठी पोलिसांना मदत केली. मात्र खुनी पकडले गेले नाहीत. पोलीसप्रमुखांवर विश्वास ठेवून त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले नाही. आता संयम सुटत चालला आहे. शांततेच्या मार्गाने लक्ष वेधूनही पोलीस खुन्यांना पकडत नसतील, तर आम्हालाही हातात शस्त्रे घ्यावी लागतील. (प्रतिनिधी)