भाकपचा नव्वदावा वर्धापन दिन

By Admin | Published: December 27, 2015 12:09 AM2015-12-27T00:09:45+5:302015-12-27T00:09:45+5:30

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ९० वा वर्धापन दिन शनिवारी मुंबईत साजरा केला. छोटेखानी सभा आणि रॅलीच्या माध्यमातून यावेळी आठवणींना उजाळा देत, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घटनेशी बांधिलकी

CPM anniversary anniversary | भाकपचा नव्वदावा वर्धापन दिन

भाकपचा नव्वदावा वर्धापन दिन

googlenewsNext

मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ९० वा वर्धापन दिन शनिवारी मुंबईत साजरा केला. छोटेखानी सभा आणि रॅलीच्या माध्यमातून यावेळी आठवणींना उजाळा देत, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घटनेशी बांधिलकी ठेवत, विकास करण्यासह धर्मांध शक्तींना थोपविण्याचा निर्धार केला.
१९१७ साली रशियात झालेली साम्यवादी क्रांती आणि कामगार वर्गाची सत्ता स्थापन झाली होती, तर १९२० साली भारतात ‘आयटक’ या कामगारांच्या पहिल्या केंद्रीय संघटनेची स्थापना झाली.
१९२०-२२ साली महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या ब्रिटीश सत्तेशी असहकार आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद आणि त्यांनी अचानकपणे त्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती अशा पार्श्वभूमीवर २६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती.
भाकपाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी सकाळी काळाचौकी, शिवडी, भोईवाडा, वरळी, कांदिवली आणि धारावीमधील कार्यालयांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. शिवाय कार्यालयांना रोषणाई करण्यात आली. तेथे छोटेखानी सभांचे आयोजन केले. दुपारी रुईया महाविद्यालयापासून या निमित्ताने रॅलीही काढण्यात आली.
येथून सुरू झालेल्या रॅलीचा माटुंगा, दादर, हिंदमाता, भोईवाडा नाका, शिवडी, काळाचौकी, लालबाग, चिंचपोकळी या मार्गाने वरळी येथे समारोप झाला.
(प्रतिनिधी)

विविध कार्यालयांमध्ये ध्वजवंदन
२६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. भाकपच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी सकाळी काळाचौकी, शिवडी, भोईवाडा, वरळी, कांदिवली आणि धारावीमधील कार्यालयांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले.

Web Title: CPM anniversary anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.