Maharashtra Gram Panchayat: ज्यांनी गुजरात जिंकवले, ते ग्राम पंचायत हरले; सी.आर.पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा पराभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:06 AM2022-12-20T11:06:28+5:302022-12-20T11:08:57+5:30

Maharashtra Gram Panchayat Election Result: राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे.

CR Patil daughter bhavini patil panel lost in maharashtra gram panchayat election 2022 | Maharashtra Gram Panchayat: ज्यांनी गुजरात जिंकवले, ते ग्राम पंचायत हरले; सी.आर.पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा पराभव!

Maharashtra Gram Panchayat: ज्यांनी गुजरात जिंकवले, ते ग्राम पंचायत हरले; सी.आर.पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा पराभव!

googlenewsNext

जामनेर जि. जळगाव:

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीचे सुरुवातीचे कलही हाती येऊ लागले आहेत. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सी.आर.पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायद सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. मात्र त्यांचे ग्रामविकास पॅनल पराभूत झालं आहे. भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला १० पैकी ३ जागा मिळाल्या आहेत. 

धक्कादायक निकाल! चिमेगावात एकनाथ शिंदे गट- काँग्रेस आघाडीची सत्ता; ठाकरेंना धोबीपछाड

भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या, त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळाले आहे. मोहाडी ग्रामपंचायतच्या निकालाकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून होतं. या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, परंतु त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.

गुजरात विजयाचं मोदींनी दिलं होतं श्रेय
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपानं यंदा ऐतिहासिक यश प्राप्त केलं. भाजपानं गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी तब्बल १५६ जागांवर यश प्राप्त केलं. गुजरातचे निकाल जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सर्वप्रथम गुजराज भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. सी.आर.पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाला गुजरातमध्ये मिळालेल्या यशाबाबत मोदींनी अभिनंदन केलं होतं. 

संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेचा पहिला विजय, या ग्रामपंयातीवर फडकवला झेंडा

सी. आर. पाटील मूळचे जळगावचे. पण, वडील गुजरातमध्ये स्थलांतरित झाले, पाटील यांच्या राजकीय प्रवासही तिथूनच सुरू झाला. पण, त्याआधी ते पोलीस सेवेत होते. सूरतमध्ये पोलिस कॉन्स्टेबल असताना त्यांनी पोलिसांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ते निलंबित झाले. त्यांच्यावर दोनदा निलंबनाची कारवाई झाली होती. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये अवैध दारुविक्रेत्यांशी पाटील यांचे लागेबांधे असल्याचा संशयावरून सूरतच्या पोलिस कृती दलाने त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर ६ वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली गेली. पाटील यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला, ते सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय झाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

Web Title: CR Patil daughter bhavini patil panel lost in maharashtra gram panchayat election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.