बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 05:07 AM2017-02-24T05:07:02+5:302017-02-24T05:07:02+5:30
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या प्रवेशामुळे भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असून, एकेकाळी महापालिकेतील प्रमुख सत्ताधारी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी आमदार लक्ष्मण जगताप व महापालिका निवडणुकीपूर्वी महेश लांडगे, त्यानंतर आझम पानसरे हे राष्ट्रवादीचे जुने सुभेदार भाजपात दाखल झाले. त्यामुळे महापालिकेत अवघे ३ नगरसेवक असलेल्या भाजपाची ताकद एकदम वाढली. महालिकेच्या १२८पैकी सर्वाधिक ७६ जागा भाजपाने जिंकल्या. मात्र, भोसरीचा गड राखला असला तरी महेश लांडगे यांचे भाऊ सचिन लांडगे पराभूत झाले. तसेच, चिंचवडमधील गड राखताना लक्ष्मण जगताप यांचे समर्थक राजेंद्र जगताप यांचा पराभव झाला; शिवाय राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघिरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांचाही पराभव झाला.
पिंपरी-चिंचवड
पक्षजागा
भाजपा७७
शिवसेना0९
काँग्रेस00
राष्ट्रवादी३६
इतर0६