शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!

By Admin | Published: April 14, 2015 01:08 AM2015-04-14T01:08:12+5:302015-04-14T01:08:12+5:30

बाबासाहेबांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी त्यांच्या मूळ आंबडवे गावी ५ कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९मध्ये आघाडी सरकारने घेतला होता.

Craftsmen can not find it! | शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!

शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!

googlenewsNext

आंबडवे दुर्लक्षित : मूळ गावाला विकासाची प्रतीक्षा
शिवाजी गोरे -दापोली
बाबासाहेबांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी त्यांच्या मूळ आंबडवे गावी ५ कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९मध्ये आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, पाच वर्षे होऊनही शिल्पसृष्टीचे नियोजन करण्यासाठी सरकारला मुहूर्तच मिळालेला नाही.
कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी २४ जून २००९ रोजी सिंधुदुर्ग येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली होती. त्यात डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी उभारण्याचा निर्णय झाला. त्यानंतर तत्कालीन ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी आंबडवे येथे भेट दिली. स्मारक व शिल्पसृष्टीसाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी केली असता सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. बाबासाहेबांच्या स्मारकाशेजारील ३६ गुंठे जागा शिल्पसृष्टीसाठी नियोजित करण्यात आली. १४ मार्च २०१२ रोजी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत समिती स्थापन झाली. सुदर्शन सपकाळ, नरेंद्र सपकाळ, नथुराम सपकाळ, अल्पेश सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीय बैठकीला उपस्थित होते. त्यात कामाला सुरुवात करण्याबाबत चर्चाही झाली. मात्र त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे नथुराम
सपकाळ यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या मूळ गावी मोठे ग्रंथालय आवश्यक आहे. तसेच शिल्पसृष्टीमुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट कळेल. येथे सद्य:स्थितीत स्मारकाशिवाय काहीही नाही.

आंबडवे येथे त्यांची भावकी आंबेडकर म्हणजे आताचे सपकाळ कुटुंबीय राहतात. बाबासाहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. बाबासाहेबांच्या उपक्रमासाठी लागणारी जमीन दान देऊन त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे. मात्र सरकारला शिल्पसृष्टीसाठी अजून मुहूर्त मिळालेला नाही.

२५ आॅगस्ट २००९ रोजी शिल्पसृष्टी उभारण्याचे परिपत्रक निघाले होते. मात्र त्यापुढे काही झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रश्नी लक्ष घालावे.
- प्रीतम रुके,
आरपीआय, जिल्हा सरचिटणीस

आंबडव गावाला भेट देणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही. येथील शिल्पसृष्टी पूर्ण व्हावी, यासाठी पुढाकार घेऊ.
- आ. संजय कदम, दापोली

बाबासाहेबांच्या मूळ गावी मोठे ग्रंथालय आवश्यक आहे. तसेच शिल्पसृष्टीमुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा
जीवनपट कळेल. येथे सद्य:स्थितीत स्मारकाशिवाय काहीही नाही.

संतांच्या नावे पैसा जमवला असल्यास त्याचा विनियोग सत्पात्री व्हावा, आपल्या सभोवताली दैन्य, दारिद्य्र, अज्ञान, रोगराई पसरली आहे़ त्यामुळे अशा पैशाचा सदुपयोग हे दु:ख, अज्ञान दूर करण्याकरिता केला जावा, असे मत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षींपूर्वी व्यक्त केले होते़

 

Web Title: Craftsmen can not find it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.