नगरमध्ये वाढदिवसावरून हाणामारी

By admin | Published: June 13, 2016 05:02 AM2016-06-13T05:02:09+5:302016-06-13T05:02:09+5:30

माजी नगरसेवक आणि एका स्थानिक नेत्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून झालेल्या वादाचे पर्यावसान थेट हाणामारी आणि तोडफोडीत झाले.

Crash on the city from birthdays | नगरमध्ये वाढदिवसावरून हाणामारी

नगरमध्ये वाढदिवसावरून हाणामारी

Next


अहमदनगर : एक माजी नगरसेवक आणि एका स्थानिक नेत्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून झालेल्या वादाचे पर्यावसान थेट हाणामारी आणि तोडफोडीत झाले. शनिवारी रात्री अकरा वाजता झालेल्या घटनेत नऊ ते दहा मोटारसायकली आणि दोन चारचाकी वाहनांचा चुराडा झाला तर चार जण जखमी झाले. त्यातील एका जखमीला पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
काँग्रेसचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या वाढदिवसाचा शनिवारी रात्री तोफखाना भागात कार्यक्रम सुरू असताना जमावाने त्यांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या भागात वाढदिवस साजरा करायचा नाही, कार्यक्रम ताबडतोब बंद करा, असे सांगत जमावाने शिवीगाळ, दमदाटी केली. त्यांच्यापैकी सूरज जाधव याने केलेल्या तलवारीच्या वारात माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचे काका प्रताप दत्तात्रय जाधव हे जखमी झाले. त्यानंतर जमावाने दांडके, हॉकीस्टिकने वाहनांची तोडफोड केली.
चैतन्य दिलीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज सुभाष जाधव, संदीप सुभाष जाधव, सुशांत सुभाष जाधव, अक्षय किरण आडेप, संदीप गड्डा यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी फिर्याद रविवारी दुपारी दाखल झाली. अर्जुन नरसिंग जज्जर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अभिमन्यू राजू जाधव, धनंजय कृष्णा जाधव (माजी नगरसेवक) आदी १० ते १२ जणांनी माळ््याची चावडी येथे येऊन मारहाण केली. बाहेरच्या लोकांचा (स्थानिक नेत्याचा) वाढदिवस आपल्या गल्लीत कसा काय साजरा करता?, अशी विचारणा करीत आरोपींनी बंदुकीच्या बटाने तसेच लाकडी दांडके आणि चाकूने मारहाण केली. मारहाणीत अर्जुन नरसिंग जज्जर, सुशांत जाधव, सूरज जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्यासह २५जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crash on the city from birthdays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.