विवेकवादी नागरिक घडवू या - प्रवीण बांदेकर
By admin | Published: March 28, 2016 02:03 AM2016-03-28T02:03:32+5:302016-03-28T02:03:32+5:30
विद्यार्थ्यांमधून विवेकवादी नागरिक घडवू या, असे आवाहन प्रा. प्रवीण बांदेकर यांनी शिक्षक सहकाऱ्यांना केले. शनिवारी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे सहाव्या शिक्षक साहित्य
मालगुंड (रत्नागिरी) : विद्यार्थ्यांमधून विवेकवादी नागरिक घडवू या, असे आवाहन प्रा. प्रवीण बांदेकर यांनी शिक्षक सहकाऱ्यांना केले. शनिवारी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे सहाव्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. साहित्यप्रेमी आणि शिक्षक संमेलनात सहभागी झाले होते. उद्घाटन प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते झाले.
देशभर असहिष्णुतेचे वातावरण आहे. निराश न होता सर्व लेखक, शिक्षकांनी सामान्य माणसांना बरोबर घेऊन लढले पाहिजे. आपण एकजुटीने लढलो तर बंदुकांचा पराभव नक्कीच होईल, असा आशावाद बांदेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
उषा तांबे यांनी आजच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडूनच उद्याचे नवे मराठी साहित्य येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या अध्यक्ष कवयित्री नीरजा, नाटककार शफाअत खान, खासदार विनायक राऊत, शिक्षक आमदार कपिल पाटील, कवी अरुण म्हात्रे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोक बेलसरे आदी उपस्थित होते.
साहित्य, कला हद्दपार ? शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली ‘साहित्य, कला, क्रीडा शिक्षण शाळेतून हद्दपार?’ साहित्य, कला, क्रीडा शिक्षणाची हेळसांड झाली तर नवा चांगला समाज निर्माण होण्याची विद्यार्थ्यांमधून जागरूक नागरिक तयार होण्याची प्रक्रियाच संपुष्टात येईल, असे मत मांडण्यात आले.