वेळीच लक्ष न दिल्यास खेकड्यांचा उपद्रव महागात पडू शकतो : माधव चितळे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 06:59 AM2019-07-13T06:59:59+5:302019-07-13T12:38:48+5:30
कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली.
सुषमा नेहरकर- शिंदे
पुणे : मातीची धरणे, कालव्यांमध्ये ओल शोधण्यासाठी खेकडे मोठ्या प्रमाणात लहान-मोठी बिळे तयार करतात. या बिळांमध्ये पाणी जाऊन कालवा, धरणाची गळती सुरु होते. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास खेकड्यांचा उपद्रव महागात पडून शकतो, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चिळते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका होत असून, त्याच्या या विधानाच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी खेकडा आंदोलने करण्यात आली. तसेच हे खेकडा प्रकरण सोशल मिडीयासह सर्वच स्तरावर चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्याची चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, मातीच्या ओल्यामध्ये, दलदलीत खेकडे घर करतात. यामुळेच प्रामुख्याने कोकण, भात शेती असलेल्या भागातील कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खेकड्यांचा उपद्रव होतो. कालव्यांमध्ये, मातीचे धरण असलेल्या भागात हे खेकडे ओल शोधण्यासाठी सुमारे ५ ते ६ मिटरपर्यंत बोगदा तयार करतात. त्यानंतर पावसामध्ये पाण्याची पातळी वाढू लागल्यावर खेकड्यांनी केलेल्या बोगद्यांमध्ये पाणी शिरून गळती सुरु होते. परंतु याकडे वेळीच लक्ष न दिल्याने या गळतीमध्ये वाढ होऊन धरण, कालवे फुटण्याचा धोका निर्माण होतो.
यामुळे खेकड्यांचा प्रदेश असलेल्या भागामध्ये मातीचे धरण, कालवे तयार करताना पाण्याच्या बाजूने सुरुवातील दगडचा थर दिला जातो. त्यानंतर मुरुम आणि नंतर वाळू टाकली जाते. यामुळे खेकड्यांनी बिळ केले तरी दगडाच्या थरामुळे काही प्रमाणात अडथळा निर्माण होता. आणि पाण्याची पातळी वाढल्यावर पाण्यासोबत मुरुम आणि वाळू देखील वाहून या बिळांमध्ये वाहून जाऊन हे बंद होण्यास मदत होत. त्यामुळे मातीची धरणे, कालवे करता या शास्त्राचा उपयोग करणे आवश्यक आहे. कोकणामध्ये बहुतेक सर्व धरणे बांधताना याचा पध्दतीने ती बांधली असून, सुरक्षित असल्याचे देखील चितळे यांनी स्पष्ट केले.
------------------------------
भात शेती असलेल्या भागात शेतक-यांना खेकड्यांचा मोठा त्रास
खेकडामुळे कोकणातील तिवरे धरण फुटल्याचा दावा केल्याने ह्यखेकडेह्ण सर्वत्र चचेर्चा विषय ठरत आहेत. परंतु भात शेती असलेल्या तालुक्यांमध्ये शेतक-यांना खेकड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. खेकड्यांकडून भात शेतींच्या बांधाला छिंद्रे पाडल्याने पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यास संपूर्ण बांध वाहून जाण्याचे अनेक प्रकार नियमित होतात. परंतु स्थानिक उपाययोजना करून खेकड्यांचा बंदोबस्त केला जातो.
- रामचंद्र शिंदे, शेतकरी, आंबोली, खेड
----------------------
असा केला जातो खेकड्यांचा बदोबस्त
धरण, कालव्याला खेकडे जागोजागी बिळ करतात. या बिळामध्ये पाणी गेल्यावर पाण्याच्या रंगावरून येथे खेकड्यांचे बिळ असल्याचे लक्षात येते. त्यानंतर या बिळांमध्ये इथेलीन डायब्रोमाईड रसायन शिजवलेला भात आणि गुळ यांचे मिश्रण करुन याचे गोळे टाकले जातात. हे औषधी गोळे खाल्यानंतर खेकडे मरतात. अनेक भागामध्ये असे विविध प्रयोग करुन खेकड्यांचा बदोबस्त केला जातो.
--------------------
प्रजनन कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास अधिक फायदा
खेकड्यांचा प्रजनन कालावधी साधारण एप्रिल ते जून असा तीन महिन्यांचा कालावधी असतो. त्यापूर्वी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात हे खेकडे सहसा बिळाच्या बाहेर येत नाहीत. यामुळे त्यांच्या प्रजनन कालावधीमध्येच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास अधिक फायद्याच्या ठरतात.
---------------------------
देखील खेकड्याचा धोका
पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने पश्चिम पट्ट्यामध्ये शेतक-यांनी लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या शेततळ््यांना खेकड्यांचा मोठा धोका असतो. शेततळ््यातील माती पोखरुन हे खेकडे जागोजागी छिद्रे पाडतात. तसेच शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी वापरलेल्या मलचिंगचा कागदाला देखील खेकडे बिळे पाडतात. यामुळे कागत फाडल्याने शेततळ्यातील पाण्याचा निचरा होतो. शेततळ्याना देखील खेकड्यांचा चांगलाच उपद्रव होतो.
- सुनिल खैरनार, कृषी अधिकारी, पुणे उपविभाग
---------------------------
खेकड्यांमध्ये कमालीची ताकद
महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्सिट्यूट (मेरी) मध्ये काम करत असताना सन २००४ मध्ये नाशिक येथील वाघेरे या छोट्या धरणावर ह्यखेकड्याह्ण संदर्भात संशोधन केले होते. खेकड्यांमुळे या धरणाला धोका निर्माण झाला होता. खेकड्यांमध्ये कमालीती ताकद असते. त्याच्या नांग्या इतक्य टणक असतात की मुरमट दगड देखील पोखरु शकतात. त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी कमी झाली का ओल्याव्यासाठी भिंतीला छिंदे्र करतात. एकाच वेळी अनेक खेकडे अशी छिंद्रे करतात. त्यानंतर पावसाळ््यामध्ये पाण्याची पातळी वाढू लागल्यावर या छिंद्रांमध्ये पाणी जाऊन गळती सुरु होती. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास कालवा, धरण फुटू शकते. केमिकल प्रयोग करुन खेकड्यांचा बदोबस्त करता येतो, हे आमच्या संशोधनामध्ये स्पष्ट झाले.
- नामदेव पठाडे, निवृत्त संशोधक ,मेरी