आयटीच्या माध्यमातून विश्वासार्ह शासनव्यवस्था निर्माण करणार

By admin | Published: May 10, 2017 01:09 AM2017-05-10T01:09:34+5:302017-05-10T01:09:34+5:30

सरकारच्या विविध योजना व सार्वजनिक सेवा जनतेपर्यंत विनाविलंब आणि सहजपणे पोहोचवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (आयटी) हे एक सशक्त माध्यम आहे.

Creating a credible government through IT | आयटीच्या माध्यमातून विश्वासार्ह शासनव्यवस्था निर्माण करणार

आयटीच्या माध्यमातून विश्वासार्ह शासनव्यवस्था निर्माण करणार

Next

सुरेश भटेवरा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारच्या विविध योजना व सार्वजनिक सेवा जनतेपर्यंत विनाविलंब आणि सहजपणे पोहोचवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (आयटी) हे एक सशक्त माध्यम आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात एक जबाबदार, पारदर्शक आणि विश्वासार्ह शासनव्यवस्था निर्माण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या प्रगती मैदानावर ओरॅकल ओपन वर्ल्ड आयोजित कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केले.
जनतेला सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अतिशय कल्पक रीतीने माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल तसेच टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रात दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा साक्षात्कार घडवल्याबद्दल ओरॅकलच्या सीईओ सफ्रा काटझ् यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. या सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
पारदर्शक कारभाराला पर्याय नाही, यावर राज्य शासनाचा विश्वास आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमाचा पुरेपूर लाभ उठवून विश्वासार्ह पद्धतीने सेवा पुरवण्याचा संकल्प आम्ही केला आहे, असे मुख्यमंत्री शेवटी
म्हणाले.
३७0 सेवा आॅनलाईन पुरविल्या जातात...-
सरकारतर्फे ३७० सेवा सध्या आॅनलाईन पुरवल्या जातात. इंटरनेटवर ‘आपले सरकार’ नावाचे महाराष्ट्राचे पोर्टल अगोदरच कार्यरत आहे. याखेरीज राज्य सरकार लवकरच माहिती तंत्रज्ञानाचा एक असा प्लॅटफॉर्म तयार करणार आहे की, सरकारचे वेगवेगळे विभाग एकाच कामासाठी तेच ते दस्तऐवज आणि प्रमाणपत्रे कोणत्याही नागरिकांकडे वारंवार मागणार नाहीत.

Web Title: Creating a credible government through IT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.