नव्या ३३५ तलाठी सजांची निर्मिती

By admin | Published: November 19, 2016 03:30 AM2016-11-19T03:30:45+5:302016-11-19T03:30:45+5:30

आदिवासी विकासमंत्री सवरांनी केले निर्णयाचे स्वागत राज्याच्या आदिवासी दुर्गम जंगलव्याप्त माडा, मिनीमाडा क्षेत्रात नव्या ३३५ तलाठी सजांची निर्मिती होणार आहे.

Creating new 335 Talathi Songs | नव्या ३३५ तलाठी सजांची निर्मिती

नव्या ३३५ तलाठी सजांची निर्मिती

Next


वाडा : आदिवासी विकासमंत्री सवरांनी केले निर्णयाचे स्वागत राज्याच्या आदिवासी दुर्गम जंगलव्याप्त माडा, मिनीमाडा क्षेत्रात नव्या ३३५ तलाठी सजांची निर्मिती होणार आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील आदिवासी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे, असे राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी शुक्रवारी वाडा येथे सांगितले.
सवरा पुढे म्हणाले की, नव्याने निर्माण होणाऱ्या तलाठी सजा क्षेत्रात शेती व जंगलावर आधारित व्यवसाय हेच आदिवासींच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे आदिवासींचा व शेतमजुरांचा नेहमी तलाठ्यांशी थेट संबंध येतो. त्याचबरोबर, बँकांचे कर्ज व्यवहार, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी तसेच पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करु न बाधित आदिवासींना आर्थिक मदत करणे या निर्णयामुळे आता अधिक सुकर होणार आहे. आदिवासी क्षेत्रात सध्या १,१४८ तलाठी तलाठी सजे असून काल महसूल विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे त्यात ३३५ नव्या सजांची भर पडणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल मंत्री विष्णू सवरा यांनी समाधान व्यक्त करु न त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या तलाठी-पटवारी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर हा राज्य शासनाचा निर्णय महत्वपूर्ण मानला जात असून तलाठी सजांची संख्या वाढणार असल्याने तलाठ्यांचे कामकाज अधिक गतिमान व पारदर्शकपणे होणार असल्याची प्रतिक्रि या व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
>हेलपाटे व पदरमोड...
आदिवासी भागामध्ये तलाठी सजाची कमतरता असल्याने अनेकदा कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येते.
वर्षाचा बराच काळ रोजगार नसल्याने किंवा स्थलांतरीत जिवन जगावे लागत असल्योन शासकीय कामासाठी होणारी पदरमोड न परवडणारी असते.

Web Title: Creating new 335 Talathi Songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.