कुरकुरेच्या पाकिटातील शिट्टीसाठी युवकाची आत्महत्या
By admin | Published: July 28, 2016 01:24 PM2016-07-28T13:24:16+5:302016-07-28T13:24:39+5:30
छोट्या भावाने कुरकुरेच्या पुड्यातील शिट्टी दिली नाही म्हणून मोठ्या भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडजवळ घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
वडवणी, दि. २८ - कुरकु-याच्या पुड्यात निघालेल्या शिट्टीवरुन दोन भावंडांत भांडणे झाली. छोट्या भावाने शिट्टी दिली नाही म्हणून मोठ्याने विषारी द्रव प्राशन करुन आपले जीवन संपवले. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री दुकडेगाव येथे घडली.
गणेश बालू पवार (१७) असे मयत युवकाचे नाव आहे. बुधवारी बालू पवार यांनी आपल्या मुलांसाठी किराणा दुकानातून कुरकुरे आणले होते. या पुड्यात खेळण्यांचे छोटे साहित्य निघते. कुरकुºयाच्या पुड्यात शिट्टी निघाली. ही शिट्टी घेण्यावरुन गणेश व त्याचा लहाना भाऊ मोनू यांच्यात वाद झाला. मोनूने गणेशच्या हातातून शिट्टी हिसकावली व स्वत: वाजू लागला. त्यामुळे गणेशला राग आला. घरातील विषारी द्रव त्याने प्राशन केले. यावेळी तो अस्वस्थ झाला. नातेवाईकांनी त्या कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी ९ वाजता त्याचा मृत्यू झाला.
क्षुल्लक कारणावरुन घडलेल्या या घटनेत एका युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.