क्राइम पेट्रोल पाहून रचला अपहरणाचा डाव

By admin | Published: February 5, 2016 03:00 AM2016-02-05T03:00:55+5:302016-02-05T03:00:55+5:30

क्राइम पेट्रोल ही टीव्ही मालिका बघून ३५ वर्षीय तरुणाचे अपहरण करणाऱ्या मोहम्मद लकी अन्सारी (३०), इमरान शेख (२९) या आरोपींना धारावी पोलिसांनी गजाआड केले आहे.

Crime abducted by petrol | क्राइम पेट्रोल पाहून रचला अपहरणाचा डाव

क्राइम पेट्रोल पाहून रचला अपहरणाचा डाव

Next

मुंबई : क्राइम पेट्रोल ही टीव्ही मालिका बघून ३५ वर्षीय तरुणाचे अपहरण करणाऱ्या मोहम्मद लकी अन्सारी (३०), इमरान शेख (२९) या आरोपींना धारावी पोलिसांनी गजाआड केले आहे.
धारावीत राहणारा जावेद कुरेशी हा ३१ जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास मुकुंदनगर परिसरात गेला असताना अज्ञातांनी त्याचे अपहरण केले. कुटुंबीयांना १ लाख ७० हजार रुपयांच्या खंडणीसाठी फोन येऊ लागल्यानंतर त्यांनी धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत एपीआय प्रसाद राऊत, किशोर पवार, पीएसआय पांडुरंग लोणकर, पोलीस अंमलदार झेंडे, साबळे, शेलार, शिंपी या तपास पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे कुरेशी कुटुंबीयांनी पैसे घेण्यासाठी आरोपींना येथील प्रियांका हॉटेलजवळ बोलावले. आरोपीची ओळख पटताच हॉटेलबाहेर सापळा रचलेल्या तपास पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
चौकशीत कुरेशीला धारावी पीएमजीपी कॉलनीतील एका खोलीत कोंडून ठेवल्याची माहिती मिळाली. तेथून कुरेशीची सुटका करत पहारा देत असलेल्या इमरान शेख (२९) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी याने ३ वर्षांपूर्वी अन्सारीकडून १ लाख ७० हजार रुपये घेतले होते. मात्र ते पैसे परत करत नसल्याने त्याने अपहरणाचा डाव रचला. क्राइम पेट्रोलमध्ये दाखवलेल्या गुन्ह्यांची माहिती पाहून त्याने हा प्रताप केल्याचे तपासात समोर आले. (प्रतिनिधी)

Web Title: Crime abducted by petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.