बच्चू कडू यांच्यासह ४५ जणांविरुद्ध गुन्हा

By Admin | Published: November 4, 2015 02:38 AM2015-11-04T02:38:00+5:302015-11-04T02:38:00+5:30

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात गेलेल्या आंदोलकांना बाहेर काढणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अरेरावी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी आ़ ओमप्रकाश

Crime against 45 people including Bachu Kadu | बच्चू कडू यांच्यासह ४५ जणांविरुद्ध गुन्हा

बच्चू कडू यांच्यासह ४५ जणांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात गेलेल्या आंदोलकांना बाहेर काढणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अरेरावी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी आ़ ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्यासह ४५ जणांविरुद्ध मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला होता़ प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे व इतर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना मुख्य कार्यकारी अधिकारी रायते यांच्या दालनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला़ त्या वेळी कडू व इतरांची पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता़ मंगळवारी सकाळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश घंटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आंदोलकांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे़

Web Title: Crime against 45 people including Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.