पोकलॅण्ड व तीन डंपरचालकांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: June 25, 2014 06:57 PM2014-06-25T18:57:40+5:302014-06-25T19:01:02+5:30
गिरणा नदी पात्रातून शासनाची परवानगी न घेता वाळूची वाहतूक करणार्या पोकलॅण्ड आणि तीन डंपरच्या चालक व मालकाविरुद्ध महसूल प्रशासनाने तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव : गिरणा नदी पात्रातून शासनाची परवानगी न घेता वाळूची वाहतूक करणार्या पोकलॅण्ड आणि तीन डंपरच्या चालक व मालकाविरुद्ध महसूल प्रशासनाने तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास दापोरा येथील तलाठी संदीप गुलाबचंद धोबाड (वय-३१) यांच्या पथकाने दापोरा शिवारातील जगदिश अत्तरदे व शालीग्राम काळे यांच्या शेताजवळील गिरणा नदी पात्रातून पोकलॅन्डने वाळूची वाहतूक करणार्या डंपर चालकांना पकडले. पथकाला शेख सैयद फैयाज अल्लाउद्दीन, एमएच १९ झेड ७४७४, एमएच १९ झेड ४८७७, एमएच १९ झेड ७२६ या डंपरमध्ये १२ हजार रुपये किंमतीची १२ ब्रास चोरीची वाळू आढळली. तलाठी संदीप धोबाड यांनी सर्व डंपरचालकांना तहसील कार्यालयात येण्याची सूचना केली. शेख सैयद फैयाज अल्लाउद्दीन हा आपले डंपर तहसील कार्यालयात लावून निघून गेला. तर अन्य डंपर चालक जळगावात निघून गेले. त्यानंतर धोबाड यांनी तालुका पोलीस स्टेशनला येत चार डंपरचे चालक व मालक तसेच पोकलॅण्ड व सेक्शन पंपावरील चालक व मालकाविरुद्ध फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल झाला. दापोरा शिवारातील गिरणा नदी पात्रातून शासनाची परवानगी नसताना अनेक महिन्यांपासून वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. महसूल प्रशासनाने वाळू चोरांविरुद्ध कारवाई करण्याची सूचना केली.