पंढरपूरच्या नगरसेवकासह सहाजणांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: February 6, 2017 02:21 AM2017-02-06T02:21:52+5:302017-02-06T02:21:52+5:30

येथील कर्नाळ रस्त्यावरील अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (२२) या तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार यांच्यासह सहाजणांविरुद्ध सांगली शहर

Crime against six people including Pandharpur corporator | पंढरपूरच्या नगरसेवकासह सहाजणांविरुद्ध गुन्हा

पंढरपूरच्या नगरसेवकासह सहाजणांविरुद्ध गुन्हा

Next

सांगली : येथील कर्नाळ रस्त्यावरील अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (२२) या तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार यांच्यासह सहाजणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी ही घटना घडली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक संदीप पवार, अर्जुन पवार, सचिन चौगुले, भैय्या पवार, नागेश धोत्रे व रामा पवार (सर्व रा. पंढरपूर) यांचा समावेश आहे. बबलू सुरवसे हा मूळचा पंढरपूरचा आहे. दोन वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये नीलेश माने या तरुणाचा खून झाला होता. या खूनप्रकरणी बबलूला अटक झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या आई, वडिलांनी त्यास सांगलीत मामाकडे राहायला पाठविले होते. तेव्हापासून बबलू सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे मामाकडे राहतो. शनिवारी दुपारी सहा जणांच्या टोळीने त्याच्यावर गोळीबार केला होता. नेम चुकल्याने बबलू बचावला होता.
नीलेश माने याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नगरसेवक संदीप पवार व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती बबलूच्या चौकशीतून पुढे आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against six people including Pandharpur corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.