युनायटेड इन्शुरन्सच्या दोन अधिकाऱ्यांसह दहा जणांविरुध्द सीबीआयकडून गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 08:47 PM2016-12-23T20:47:06+5:302016-12-23T20:47:06+5:30

येथील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांसह अन्य आठ एजंट आणि वाहनधारकांविरुध्द सीबीआयने न्यायालयात गुन्हे दाखल

Crime against the ten accused, including two United Insurance officials, | युनायटेड इन्शुरन्सच्या दोन अधिकाऱ्यांसह दहा जणांविरुध्द सीबीआयकडून गुन्हे

युनायटेड इन्शुरन्सच्या दोन अधिकाऱ्यांसह दहा जणांविरुध्द सीबीआयकडून गुन्हे

Next

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 23 - येथील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांसह अन्य आठ एजंट आणि वाहनधारकांविरुध्द सीबीआयने न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपघात झाल्यानंतर मागच्या तारखेने वाहनांचा विमा उतरवून कंपनीची फसवणूक केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने लातूरच्या विमा वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सेंट्रल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टीगेशन अर्थात् सीबीआयच्या वतीने वेबसाईटवर काढण्यात आलेल्या बुलेटीननुसार लातूर जिल्ह्यातील सोळा वाहनांच्या विमा चुकीच्या पध्दतीने देऊन ३ कोटी २५ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. २००९ ते २०१४ या काळात जिल्ह्यातील १६ अपघातग्रस्त वाहनांना विमा नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मागच्या तारखेने कर्मचाऱ्यांनी विमा उतरवून दिला होता. या बेकायदेशीर कामामुळे कंपनीचे सव्वा तीन कोटीचे नुकसान केल्याचा दोन कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यासह या प्रकरणात गुंतलेल्या एजंट आणि वाहनधारकांचा समावेशही आरोपीत असल्याचे सांगण्यात आले. या सर्वांविरुध्द न्यायालयात दिलेल्या फिर्यादीनुसार कलम १२० (ब), भादवि ४२०, ४६८, ४७७ (अ) आणि पीसी अ‍ॅक्ट १९८८ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सीबीआयच्या प्रसिध्दीपत्रकानुसार असाच घोटाळा उस्मानाबाद, जळगाव, औरंगाबाद आणि नांदेड येथील युनायटेड इन्शुरन्सच्या शाखांनी झाल्याचे म्हटले आहे.

आरोपींची नावांची माहिती नाही : विभागीय व्यवस्थापक अष्टेकर
लातूर न्यायालय आणि युनायटेड इन्शुरन्सच्या लातूर शाखेतून यातील आरोपींची नावे मिळू शकले नाहीत. विमा कंपनीच्या लातूर शाखेचे विभागीय शाखा व्यवस्थापक पांडुरंग अष्टूरकर यांनी माध्यमांना माहिती देण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे सांगितले. याबाबत विमा कंपनीच्या चेन्नई येथील मुख्य शाखेला संपर्क साधवा, असे सांगितले. आमच्याही कानावर आले आहे. अधिकृतपणे आम्हाला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून काहीही बोलण्यास नकार दिला. लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातही हा गुन्हा गोपनीय असल्याची चर्चा होती.

Web Title: Crime against the ten accused, including two United Insurance officials,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.