नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्यांवर गुन्हा

By admin | Published: May 17, 2016 04:15 AM2016-05-17T04:15:25+5:302016-05-17T04:15:25+5:30

परदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवून महाराष्ट्र व झारखंडमधील तिघांची फसवणूक केल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’च्या ‘हेलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध होताच नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Crime against those who deceive the job | नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्यांवर गुन्हा

नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्यांवर गुन्हा

Next


मीरा रोड : परदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवून महाराष्ट्र व झारखंडमधील तिघांची फसवणूक केल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’च्या ‘हेलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध होताच नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर फसवणूक झालेल्या पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशातील पाच जणांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने आतापर्यंत फसवणूक झालेल्यांची संख्या आठ झाली आहे.
मीरा रोड येथील पूनम सागर कॉम्प्लेक्समध्ये इश्तीहाक सर्जी याने ‘ओव्हरसी फ्युचर कन्सल्टनसी’ हे कार्यालय थाटले होते. त्याने नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांकडून लाखो रुपये व पासपोर्ट घेतले. त्यासाठी त्याने मुख्य कार्यालय अरु णाचल व नंतर आसाम येथे असून झुबीन राजनिओग याच्या ‘फ्युचर करिअर’ या एजन्सीचा पत्ता दिला. मात्र, प्रत्यक्षात त्यांना ना नोकरी मिळाली ना त्यांचे पैसे आणि पासपोर्ट परत मिळाले. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against those who deceive the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.