उदयनराजे भोसले यांची खिल्ली उडविणाऱ्यावर गुन्हा
By Admin | Published: September 9, 2016 05:20 AM2016-09-09T05:20:03+5:302016-09-09T05:20:03+5:30
अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात केली होती. त्याचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले.
सातारा : अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात केली होती. त्याचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले. औरंगाबाद येथील दीपक केदार या युवकाने खासदार उदयनराजेंचा आक्षेपार्ह फोटो आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समजल्यानंतर साताऱ्यात खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत ‘फेसबुक’ला संबंधित पोस्ट काढायला लावली. औरंगाबादच्या दीपक केदारसह ज्यांनी ही पोस्ट शेअर केली त्यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. उदयनराजे यांचे समर्थक गणेश जाधव यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, गुरुवारी उदयनराजे समर्थकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेत कारवाईची मागणी केली होती.