भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2017 03:03 AM2017-05-24T03:03:17+5:302017-05-24T03:03:17+5:30
कार लोन मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याची रक्कम हडप केल्याप्रकरणी कल्याणमधील भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कार लोन मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याची रक्कम हडप केल्याप्रकरणी कल्याणमधील भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश अरोरा असे त्याचे नाव आहे. त्याने दोन लाखांच्या कर्जाचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोपरखैरणे येथील बालाजी गार्डनमध्ये राहणारे जितेश श्वेता यांनी कार लोनसाठी नीलेशकडे कागदपत्रे आणि फायनान्स कंपनीसाठी भरलेला फॉर्म सोपवला होता. नीलेशची आई आणि भाऊ भाजपाचे पदाधिकारी आहेत. नीलेशने या कागदपत्रांचा दुरुपयोग करत जितेश यांच्या नावे मंजूर झालेल्या कार लोनची रक्कम स्वत:कडेच ठेवली.
कालांतराने लोनचे हप्ते भरण्याची वेळ आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे समजताच जितेशने नीलेश आणि फायनान्स कंपनीला जाब विचारला. त्यावर खोट्या केसेस करण्याची धमकी दिल्याने जितेश यांनी महात्मा
फुले पोलीस स्थानकात तक्रार
नोंदवली आहे.