कोल्हापुरच्या पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या एपीआयचा धिंगाणा

By admin | Published: June 4, 2016 03:23 AM2016-06-04T03:23:29+5:302016-06-04T03:23:29+5:30

स्वत:च्या नातेवाईकांना मारहाण करुन पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या एपीआय अरूण धनावडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Crime Branch of the crime branch at Kolhapur | कोल्हापुरच्या पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या एपीआयचा धिंगाणा

कोल्हापुरच्या पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या एपीआयचा धिंगाणा

Next

मुंबई : स्वत:च्या नातेवाईकांना मारहाण करुन पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या एपीआय अरूण धनावडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आपल्याला खोटया गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप धनवडे करत आहेत. विशेष म्हणजे या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी धनावडे यांना सेवेतून निलंबीत केले आहे. तसेच त्यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
वरळी पोलीस वसाहतीत राहण्यास असलेले धनवडे गुन्हे शाखेच्या युनीट तीनमध्ये कार्यरत आहेत. मे महिन्यात सुटी घेउन ते गडहिंग्लजच्या भडगाव येथील गावी गेले होते. धनवडे यांच्या म्हणण्यानुसार, २४ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास त्यांची पत्नी, मुलगी, सासू-सासरे, मेव्हणा भडगाव रेथील घरी आले. या सर्वांनी मिळून मला मारहाण केली. तसेच गावी घराच्या डागडुजीसाठी फंडातून काढलेले दहा लाख रूपये, दागिने घेउन सर्वजण निघून गेले. या घटनेची माहिती देण्यासाठी मी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गेलो. तेथे माझ्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी तेथील पोलीस निरिक्षक अवदुंबर पाटील यांनी मलाच ताब्यात घेतले. रात्री आठच्या सुमारास मला मारहाण केली. मारहाणीचा मोबाईलमध्ये आॅडीओ-व्हीडीओ शूट केला म्हणून रागाच्या भरात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून माझ्याविरोधात गुन्हा नोंद केला. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री, पोलीस महांसचालक, मानव अधिकार आयोग, लोकायुक्त कार्यालयात लेखी तक्रार अर्ज दिल्याचे धनवडे सांगतात.
गडहिंग्लज पोलिसांनी धनवडेंचा आरोप फेटाळून लावला. पोलीस ठाण्याचे प्रमुख अवदुंबर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार धनवडे वरळी कॅम्पमध्ये राहातात. वैयक्तिक व घरगुती कारणावरून कॅम्पमधील अन्य पोलीस कुटुंबांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. हे कारण वैयक्तिक असून, तपासाशी निगडीत नसल्याने सांगता येणार नाही. मात्र याच कारणावरून त्यांचे कुटुंबिय २४ मे रोजी भडगावात आले होते. सायंकाळी त्यांनी भिंतीवर डोके आपटून घेत स्वत:ला जखमी करून घेतले. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फोडले. त्यांनंतर मात्र त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस ठाण्यात येण्याआधी मी धनवडेंना ओळखत नव्हतो. मात्र एक पोलीस अधिकारी म्हणून त्रांना समजावून सांगण्याचा खुप प्रयत्न केला. गुन्हा नोंदवून अटक केल्यानंतर जेव्हा त्यांना न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायाधिशांसमोर त्यांनी मारहाणीबाबत काहीच सांगितलेले नाही. मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी माध्यमांमध्ये खोटी माहिती देत यंत्रणेवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Crime Branch of the crime branch at Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.