‘क्राईम ग्राफ’ वाढतोय...

By admin | Published: May 4, 2017 01:51 AM2017-05-04T01:51:19+5:302017-05-04T01:51:19+5:30

उपराजधानीतील गुन्ह्यांवर नियंत्रण आले असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांकडूनदेखील वारंवार करण्यात आला आहे.

'Crime graph' is growing ... | ‘क्राईम ग्राफ’ वाढतोय...

‘क्राईम ग्राफ’ वाढतोय...

Next

३ महिन्यांत २३ हत्या  गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कुठे कमी झाले ? नागपूरकर किती सुरक्षित ?

नागपूर : उपराजधानीतील गुन्ह्यांवर नियंत्रण आले असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांकडूनदेखील वारंवार करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात २०१६ च्या तुलनेत २०१७ च्या पहिल्या तीन महिन्यांत गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात फारशी घट झालेली नाही. हत्या, चोरी, अपहरण, दरोडे यासारखे गुन्हे वाढीस लागले आहे. माहितीच्या अधिकारातून अधिकाऱ्यांच्या दाव्यांमधील फोलपणा समोर आला आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर शहरातील गुन्ह्यांबाबत विचारणा केली होती. १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत नागपूर शहरात किती गुन्हे झाले, हत्या-बलात्कार-चोरी यांचे प्रमाण किती होते, अंमली पदार्थांचा किती साठा सापडला, सायबर क्राईमचे प्रमाण किती होते, जुगार खेळणाऱ्यांवरील कारवाईचे प्रमाण इत्यादी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत २,३८९ गुन्हे दाखल झाले होते. तर या वर्षात हे प्रमाण २,३५१ इतके आहे. या तीन महिन्यांतील एकूण गुन्हे अवघ्या ३८ ने घटले असले तरी गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे. यंदा तीन महिन्यांत शहरात २३ हत्या झाल्या.
मागील वर्षी हाच आकडा १७ इतका होता. २०१६ मध्ये बलात्कारांच्या प्रकरणांची संख्या ३२ होती व यावर्षी ती संख्या ४१ वर पोहोचली आहे. छेडखानी करताना यंदा ७६७ जणांवर कारवाई करण्यात आली.

‘क्राईम ग्राफ’ वाढतोय...

‘सायबर क्राईम’अंतर्गत २०१६ या संपूर्ण वर्षात ९६ गुन्हे दाखल झाले होते. यंदा मार्च महिन्यापर्यंत २८ गुन्ह्यांची नोंद झाली.
चोरी, दरोडे, अपहरणदेखील वाढीस
२०१६ व २०१७ मधील पहिल्या तीन वर्षांतील चोरी, दरोडे व अपहरणाच्या घटनांची आकडेवारीदेखील वाढलेली आहे. २०१६ मध्ये चोरी, दरोडे व अपहरणाची अनुक्रमे ७६४, ५३ व १०३ प्रकरणांची नोंद झाली होती. २०१७ मध्ये हीच संख्या अनुक्रमे ७७६ (१२ ने वाढ), ७६ (२३ ने वाढ) व ११९ (१६ ने वाढ) इतकी झाली आहे. चेनस्नॅचिंग व फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ११ व ३ प्रकरणांनी घट झाली आहे.
‘सायबर क्राईम’अंतर्गत २०१६ या संपूर्ण वर्षात ९६ गुन्हे दाखल झाले होते. यंदा मार्च महिन्यापर्यंत २८ गुन्ह्यांची नोंद झाली. २०१६ व २०१७ मधील पहिल्या तीन वर्षांतील चोरी, दरोडे व अपहरणाच्या घटनांची आकडेवारीदेखील वाढलेली आहे. २०१६ मध्ये चोरी, दरोडे व अपहरणाची अनुक्रमे ७६४, ५३ व १०३ प्रकरणांची नोंद झाली होती. २०१७ मध्ये हीच संख्या अनुक्रमे ७७६ (१२ ने वाढ), ७६ (२३ ने वाढ) व ११९ (१६ ने वाढ) इतकी झाली आहे. चेनस्नॅचिंग व फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ११ व ३ प्रकरणांनी घट झाली आहे.

 

Web Title: 'Crime graph' is growing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.