5 जणांना उडवणा-या "त्या" महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 10:32 PM2017-04-19T22:32:34+5:302017-04-19T22:32:34+5:30

भरधाव कारने पाच जणांना उडवून मायलेकीचा जीव घेणा-या गंभीर गुन्हयात सुजाता जयप्रकाश श्रॉफ यांच्याविरूद्ध पोलिसांनी जामीनपात्र कलम लावल्यामुळे

The crime of human beings is a crime against innocent people | 5 जणांना उडवणा-या "त्या" महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

5 जणांना उडवणा-या "त्या" महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 19 - भरधाव कारने पाच जणांना उडवून मायलेकीचा जीव घेणा-या गंभीर गुन्हयात सुजाता जयप्रकाश श्रॉफ  यांच्याविरूद्ध पोलिसांनी जामीनपात्र कलम लावल्यामुळे तिला अवघ्या काही तासातच जामीन मिळाला, या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये टीकेची झोड उठल्याने पोलिसांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले, अखेर पोलिसांनी तिच्यावर सदोष मनुष्यवधाचे कलम लावले.

दोन दिवसांपूर्वी दुपारी बाणेर येथे सुजाता श्रॉफने बेदरकारपणे कार चालवून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर थांबलेल्या पाच जणांना उडवले. त्यामध्ये इशिका ही तीन वर्षाची मुलगी आणि तिची आई पूजा अजयकुमार विश्वकर्मा हे ठार झाले. तर तिघेही गंभीर जखमी आहेत. सीसीटिव्ही कँमेरात हा अपघात बंदिस्त झाल्याने काही क्षणातच याचा व्हिडिओ व्हॉटस अपवर सर्वत्र फिरला. हा अपघात पाहाताना सर्वांचेच मन सुन्न झाले. मात्र सुजाता श्रॉफ हिला अटक झाल्यानंतर अवघ्या काही तासातच जामीन मिळाल्यामुळे
समाजातून टीकेची झोड उठली. पोलिसांनी हा अपघाताचा गुन्हा दाखल करताना 304 (अ)279, 338 कलम लावून गुन्हा दाखल केला. त्यामुळे तिला मंगळवारी सकाळी साडे नऊला अटक केल्यानंतर दुपारी लगेच जामीन मंजूर झाला. पाच जणांना कारने उडवून दोघांचा जीव घेऊनही अवघ्या काही तासात सुजाताला जामीन मिळाल्याने पोलिसांना या घटनेचे गांभीर्य कळले नसल्याची प्रतिक्रिया
नागरिकांमध्ये उमटली. याप्रकरणात पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याने अखेर सुजातावर कडक कारवाई व्हावी यासाठी 304(अ) हे कलम काढून ३०४ हे सदोष मनुष्यवधाचे कलम लावण्यात आले आहे. सुजाताचा जामीन रद्द व्हावा यासाठी न्यायालयात चतु:शृंगी पोलिसांनी अर्ज केला असून, त्यावर २२ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

Web Title: The crime of human beings is a crime against innocent people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.