"जय महाराष्ट्र" लिहिलेली एसटी घेऊन गेलेल्या चालक, कंडक्टरवर राजद्रोहाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 03:28 PM2017-06-03T15:28:06+5:302017-06-03T15:28:06+5:30

"जय महाराष्ट्र’ लिहिलेली पहिली बस बेळगावात घेऊन जाणा-या एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

The crime of sedition on the driver, the conductor who took the ST written by "Jai Maharashtra" | "जय महाराष्ट्र" लिहिलेली एसटी घेऊन गेलेल्या चालक, कंडक्टरवर राजद्रोहाचा गुन्हा

"जय महाराष्ट्र" लिहिलेली एसटी घेऊन गेलेल्या चालक, कंडक्टरवर राजद्रोहाचा गुन्हा

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - "जय महाराष्ट्र’ लिहिलेली पहिली बस बेळगावात घेऊन जाणा-या एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय महाराष्ट्र’ लिहिलेली पहिली बस बेळगावात आल्यानंतर ‘जय महाराष्ट्र’ घोषणा दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरसोबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवरही राजद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. 143, 147 आणि 153 अ कलमाअंतर्गत मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
मदन बामणे, अमर यळ्ळूरकर, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर यांच्यासह अन्य बारा जणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
(‘जय महाराष्ट्र’:मुंबई-बेळगाव एसटी धावली)
 
‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली एसटी बेळगावात दाखल झाली त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बसचं जंगी स्वागत केलं. तसंच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि भगवा फेटा घालून स्वागत केलं आणि जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यासह एसटी चालक, कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
एसटीच्या नवीन बोधचिन्हासह ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्याचा समावेश असलेली ‘मुंबई-बेळगाव’ ही पहिली एसटी शुक्रवारी सकाळी बेळगावच्या दिशेने रवाना झाली होती. एसटीचे नियोजन व पणन विभागाचे महाव्यवस्थापक कॅप्टन विनोद रत्नपारखी यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवला होता.
 
मुंबई सेंट्रल आगार येथून मुंबई-बेळगाव ही एसटी सकाळी ७.३० वाजता मार्गस्थ करण्यात आली होती. यावेळी रत्नपारखी यांच्यासह कामगार प्रतिनिधी श्रीरंग बरगे हेदेखील उपस्थित होते. 
 
कर्नाटक येथील मंत्र्यांनी ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्यामुळे वादंग निर्माण केला होता. यावर परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटीच्या सर्व बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, एसटीच्या ६९व्या वर्धापन दिनी एसटीच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या बोधचिन्हात जय महाराष्ट्रचा समावेश करण्यात आला आहे. नवीन बोधचिन्हासह पहिली बस मुंबई-बेळगाव या मार्गावर मार्गस्थ करण्यात आली होती. लवकरच एसटी ताफ्यातील सर्व बसवर नवीन बोधचिन्ह लावण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
 

Web Title: The crime of sedition on the driver, the conductor who took the ST written by "Jai Maharashtra"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.