हुंड्यासाठी लग्न मोडणा-या कुटुंबाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:29 AM2018-01-01T06:29:53+5:302018-01-01T06:30:01+5:30
दोन वर्षांपूर्वी लग्न जुळल्यानंतर एका तरुणाने आपल्या भावी वधूसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. आता मात्र, ऐनवेळी हुंडा मागून लग्नास नकार दिला. त्यामुळे या तरुणावर आणि त्याच्या नातेवाइकांवर बलात्कार, तसेच हुंड्यासाठी लग्न मोडण्याच्या आरोपाखाली सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नागपूर : दोन वर्षांपूर्वी लग्न जुळल्यानंतर एका तरुणाने आपल्या भावी वधूसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. आता मात्र, ऐनवेळी हुंडा मागून लग्नास नकार दिला. त्यामुळे या तरुणावर आणि त्याच्या नातेवाइकांवर बलात्कार, तसेच हुंड्यासाठी लग्न मोडण्याच्या आरोपाखाली सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अभिजित बबनराव दातारकर (२६) असे आरोपीचे नाव असून तो गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी आहे. सध्या तो नागपुरातील वनामतीत नोकरीला आहे. वणी (जि. यवतमाळ) येथील एका तरुणीसोबत (२३) त्याचे २०१५मध्ये लग्न जुळले. सामाजिक रीतीरिवाजाप्रमाणे देण्याघेण्याच्या गोष्टी झाल्यानंतर त्यांचे साक्षगंधही झाले. त्यानंतर त्यांच्यात शरीरसंबंधही आले. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर तरुणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली. हे कळताच अभिजित आणि त्याच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात पोहोचून तिचे मन वळविले. त्यांच्यात आपसी समेट झाल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले. काही दिवसांनी त्यांच्यात पुन्हा बिनसल्याने अभिजितने लग्नाला नकार दिला.